Liver Health: दारू पिऊन लिव्हर डॅमेज झालंय, 'हे' ५ पदार्थ खाऊन लगेच व्हाल ठणठणीत

Published : Sep 27, 2025, 02:43 PM IST

अल्कोहोलमुळे यकृताचे नुकसान झाल्यास पायात अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. योग्य आहार घेतल्यास यकृताचे आरोग्य सुधारता येते, ज्यामध्ये बीट, हळद, लसूण, पालेभाज्या आणि अक्रोड या ५ पदार्थांचा समावेश केल्यास फायदा होतो.

PREV
16
Liver Health: दारू पिऊन लिव्हर डॅमेज झालंय, 'हे' ५ पदार्थ खाऊन लगेच व्हाल ठणठणीत

आपल्या शरीरात काही अवयव कायम कार्यरत असतात. त्याबद्दलची मात्र आपल्याला माहिती नसते. सर्वात व्यस्त अवयव लिव्हर म्हणजेच यकृत असून तो अतिशय महत्वाचं काम करतो.

26
लिव्हर काय काम करते?

शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर काढणं, पित्त तयार करून पचनास मदत करणं, जीवनसत्त्वं व प्रथिने साठवून ठेवणं, मेटाबॉलिझम नियंत्रित करणं ही त्याची प्रमुख कामं आहेत. लिव्हरची ही महत्वाची काम असून त्याच अन्न पचनात मोठं योगदान आहे.

36
लिव्हरमध्ये बिघाड झाल्यावर काय करावं?

लिव्हरमध्ये बिघाड झाल्यावर प्रथिने व जीवनसत्त्व D यांचा उपयोग नीट होत नाही. याचा थेट परिणाम स्नायूंवर होतो आणि वयानुसार पायांमध्ये अचानक शक्ती कमी जाणवू लागते.

46
आपल्याला आधी कोणते संकेत मिळतात?

लिव्हरवर ताण आला की शरीर काही संकेत द्यायला लागतं. पाय पटकन थकणं, वारंवार गोळे येणं, जडपणा जाणवणं, सतत थकवा जाणवणं ही त्याची सुरुवातीची चिन्हं आहेत.

56
योग्य आहारामुळे काय होतं?

लिव्हरची पेशी मजबूत होते, रक्त शुद्ध होतं आणि स्नायूंना अधिक ताकद मिळते. काही विशेष पदार्थ दररोज आहारात घेतल्यास लिव्हर निरोगी राहतो आणि पायांमध्ये नवचैतन्य येतं.

66
यकृत चांगलं राहण्यासाठी काय करावं?

यकृत चांगलं राहण्यासाठी आहारात बीट, हळद, लसूण, पालेभाज्या आणि आक्रोडचा समावेश करावा. अशा प्रकारचा आहार घेतल्यावर आपलं यकृत व्यवस्थित राहायला मदत मिळते.

Read more Photos on

Recommended Stories