अक्रोड-बदामाप्रमाणे मखानाही पोषक तत्त्वांचे भांडार आहे. यामध्ये कमी कॅलरीज, फायबर, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, लोह आणि कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते.
100 ग्रॅम पोटीन मखानामध्ये 347 कॅलरीज उर्जा असते. 9.7 ग्रॅम प्रोटीन व 14.5 ग्रॅम फायबर असते. एक ग्रॅम फॅट्स आणि 76 ग्रॅम कार्बोहाइड्रेट असतात.
मखानामध्ये फायबर असल्याने मेटाबॉलिज्म सुधारला जातो. कॅलरीज नियंत्रित ठेवण्यासह पोट भरलेले राहते. याशिवाय वजन वेगाने कमी होण्यास मदत होते.
मखानामध्ये सोडिअम आणि फॅटचे प्रमाण कमी असते. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. हृदयाच्या आरोग्यासाठी दररोज मूठभर मखाना खाणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
मखानामध्ये कॅल्शिअम असते. यामुळे हाडं बळकट होण्यास मदत होते. याशिवाय ऑस्टियोपोरोसिसची समस्या असलेल्यांनीही मखानाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
मखानामुळे मेटाबॉलिज्म सुधारण्यासह रक्तातील साखरचा स्तर वाढण्यावर नियंत्रण मिळवले जाते. खरंतर, मधुमेहाच्या रुग्णांना दररोज मूठभर मखानाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
मखानाचे सेवन करणे सेक्स लाइफसाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते. यामुळे शुक्राणूंच्या समस्येत सुधारण्यास मदत होते.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.