तेलंगणातील गणपती मिरवणूकचा व्हिडीओ झाला व्हायरल, पाहून व्हाल थक्क

Published : Sep 21, 2024, 02:07 PM ISTUpdated : Sep 21, 2024, 02:11 PM IST
thumbnil

सार

तेलंगणातून एका गणपतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये गणपती त्याच्या आईच्या मांडीवर बसून पुस्तक वाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्यावर अनेक कमेंट्स आणि लाईक्स येत आहेत.

सोशल मीडियावर एक गणपतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तेलंगणा राज्यातील असून यामध्ये गणपती देवतेला एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये घेऊन जाताना भाविक भक्त दिसून येत आहेत. भाविकांनी यावेळी गणपतीच्या मिरवणुकीची सुंदर सजावट केलेली दिसून आली. यावेळी आकाशात सूर्य वरती गेल्यामुळे त्याचा प्रकाश ट्रॉलीवर पडला आहे. 

गणपतीचा व्हिडीओ झाला व्हायरल - 
गणपती त्याच्या आईच्या मांडीवर बसला असून तो पुस्तक वाचत असल्याचं दिसून आलं आहे. आई पार्वतीच्या मांडीवर गणपती बसला असून तो पुस्तक वाचत आहे. गणपतीच्या मूर्तीकडे आजूबाजूच्या लोकांनी व्हिडीओ काढला आहे, त्यावेळी तेथे उपस्थित असणारा एक पोलीस व्हिडीओ काढत आहे. यावेळी या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणावर कमेंट केलं असल्याचं दिसून आलं आहे. 

गणपती बाप्पा मोरयाच्या करण्यात आल्या कमेंट - 
या व्हिडिओवर गणपती बाप्पा मोरया, जय गणेश अशा स्वरूपाच्या कमेंट मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओवर चौदा हजार लाईक्स, एक हजार दोनशे रिपोस्ट आणि ७४ कमेंट करण्यात आल्या आहेत. 

PREV

Recommended Stories

थंडीत हि ज्वेलरी घालून लग्नात करा हवा, स्वेटर-शॉलवर घाला फॅन्सी डिझाइन
पत्नीला भेट द्या 5gm चे सुंदर सुई धागा कानातले, खुप सुंदर दिसतील!