Vinayak Chaturthi 2025 : विनायक चतुर्थीला करा हा एक उपाय, कर्जातून पडाल बाहेर

Published : Mar 03, 2025, 08:49 AM ISTUpdated : Mar 03, 2025, 08:50 AM IST
 Angarki Chaturthi 2024 Maharashtra Ganpati Temples

सार

आज (3 मार्च) विनायक चतुर्थी साजरी केली जात आहे. या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा-प्रार्थना केली जाते. अशातच आयुष्यात एखाद्या संकटाचा सामना करत असाल किंवा आर्थिक समस्या, कर्ज अशा गोष्टींमध्ये अडकला असाल तर आजच्या दिवशी एक खास उपाय करू शकता. 

Vinayak Chaturthi 2025 : यंदा विनायक चतुर्थी 3 मार्च 2025 रोजी साजरी केली जात आहे.. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला लोक विनायक चतुर्थी साजरी करतात.. शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला येणाऱ्या विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केली जाते. जे भक्त विघ्नहर्तेची भक्तीभावाने पूजा करतात आणि व्रत करतात त्यांच्यावर भगवान गणेश प्रसन्न होतात आणि त्यांच्यावर नेहमीच आशीर्वाद वर्षाव करतात. हिंदू कॅलेंडरनुसार, लोक आज फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाला म्हणजेच 3 मार्च रोजी विनायक चतुर्थी साजरी करणार आहेत. 

गणपतीची पूजा 

पूजेदरम्यान, भगवान गणेशाला त्यांचे आवडते लाडू अर्पण करा. त्यांना फुले, मोदक, दूर्वा इत्यादी अवश्य अर्पण करा. शुभ मुहूर्तावर पूजा केल्याने शुभ लाभ मिळतील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. विनायक चतुर्थीला भगवान गणेशाचे स्तोत्र पठण करणे देखील फायदेशीर आहे. पूजेमध्ये स्तोत्र पठण केल्यानंतर, शेवटी आरती करा. विनायक चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही आणखी एक खात्रीशीर काम केले तर भगवान गणेश तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील.

करा हा उपाय

आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच आर्थिक तंगी, करियरमध्ये अडथळा, पैशांसंबंधित समस्या किंवा कर्जाच्या बोझ्यातून बाहेर पडायचे असल्यास आजच्या दिवशी एक खास उपाय करुन पाहा.या उपायामुळे आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल. 

विनायक चतुर्थीला तुम्ही गणपतीच्या मंदिरात जा. घरातून गूळ आणि तूप घेऊन निघा. यासोबतच, दुर्वा गवताची माळही गणपतीला अर्पण करा. देवाला गूळ आणि तूप अर्पण करा आणि ओम गं गणपतये नमो नमः या शब्दाचा11 वेळा जप करा. यामुळे आयुष्यातील समस्या, दुःख आणि कर्जाचा बोझा काही दिवसांतच दूर होण्यास सुरुवात होईल. 

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

PREV

Recommended Stories

दात पिवळे दिसतात? रोजच्या 'या' ५ चुका ठरतात तुमच्या हसण्याला अडथळा!, कारणे जाणून घ्या
कोंडा झालाय, आता टेन्शन नाही! हे ४ जादुई घरगुती उपाय करा आणि कोंड्याला कायमचा बाय-बाय म्हणा!