Tulsi Vivah 2023 : तुळशी विवाहाचा सोहळा का साजरा केला जातो? जाणून घ्या ही कथा

Tulsi Vivah 2023 : तुळशी विवाह सोहळा साजरा करण्यामागील कथा माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती…

Harshada Shirsekar | Published : Nov 23, 2023 1:30 PM IST / Updated: Nov 24 2023, 10:49 AM IST

Tulsi Vivah 2023 Date And Time : दिवाळीच्या 10 दिवसानंतर देवउठनी एकादशीचे व्रत (Dev Uthani Ekadashi 2023) ठेवले जाते. या दिवशी भगवान विष्णू आपल्या योग निद्रेतून जागे होतात. त्यानंतर त्यांचा विवाह तुळशीसोबत (Tulshiche Lagn) केला जातो. यंदा तुळशी विवाह सोहळा 24 नोव्हेंबरला (2023) आहे. खरंतर तुळशी विवाह केल्याने विवाह, धनासंबंधित सर्व समस्या दूर होतात, असे मानले जाते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भगवान विष्णू देवी लक्ष्मींचे पती आहेत. पण असे नक्की काय झाले की, भगवान विष्णूंना तुळशीसोबत विवाह करावा लागला?  जाणून घेऊया याबद्दलची कथा सविस्तर.

तुळशी विवाहाची पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळात एक राक्षस होता, ज्याचे नाव जालंधर असे होते. तो फार शक्तिशाली होता आणि त्याचा पराभव करणे सोपे नव्हते. त्याच्या शक्ती मागील कारण होते त्याची पत्नी वृंदा. जालंधरची पत्नी वृंदा ही पतिव्रता होती. तिच्या प्रभावामुळे जालंधरचा कोणीही पराभव करू शकत नव्हते. जालंधरची दहशत एवढी वाढली होती की, देवतागणही त्यामुळे त्रस्त झाले होते. जेव्हा-जेव्हा जालंधर युद्धावर जायचा तेव्हा तुलसी भगवान विष्णूंची पूजा करायची व भगवान विष्णू तिच्या सर्व मनोकामना पूर्ण करायचे..

भगवान विष्णूंनी मोडले वृंदाचा पतिव्रता धर्म

जालंधरपासून मुक्ती मिळावी म्हणून सर्व देवांनी भगवान विष्णूकडे धाव घेतली आणि त्यांच्याकडे आपली व्यथा मांडली. यादरम्यान वृंदाचा पतिव्रता धर्म मोडणे अत्यंत गरजेची असल्याची बाब समोर आली. वृंदाचे पतिव्रता धर्म मोडण्यासाठी भगवान विष्णूंनी जालंधराचे रूप धारण करत वृंदाला स्पर्श केला. याच कारणास्तव तिचा पतिव्रता धर्म मोडला गेला आणि जालंधरची शक्ती कमी झाली. त्याचसोबत युद्धात भगवान शंकराने त्याचे शीर हे धडापासून वेगळे केले.

वृंदाने विष्णूंना दिला श्राप

वृंदाला जेव्हा विष्णूंनी आपल्याला फसवले असे कळले तेव्हा तिला फार वाईट वाटले. दुखावलेल्या वृंदाने यावेळेस भगवान विष्णूंना दगड (शाळीग्राम) होण्याचा श्राप दिला. यानंतर माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना श्रापातून मुक्त करावे, अशी प्रार्थना वृंदाकडे केली. 

शाळीग्राम आणि तुळशीचे लग्न का केला जातो?

वृंदाने भगवान विष्णूंना श्रापातून मुक्त करत आत्मदहन केले. जेथे वृंदा भस्म झाली तेथे एक लहान रोप उगवले. ज्याला विष्णूंनी तुळशीचे नाव दिले. शाळीग्रामच्या नावाने माझे एक रूप या दगडात असेल. ज्याची पूजा तुळशीसोबत केली जाईल. याच कारणामुळे दरवर्षी तुळशीचा विवाह केला जातो.

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा 

Astrology Remedy For Money: आर्थिक समस्यांपासून हवीय सुटका? असा करा हळदीचा उपाय

White Hair Solution : पांढऱ्या केसांपासून हवीय मुक्तता? मग करा हे आयुर्वेदिक उपाय

Bhaubeej 2023 : बहिणीने टिळा लावल्यास कसा होतो भावाचा भाग्योदय?

Share this article