Diwali Padwa 2023 : दिवाळी पाडवा व बलिप्रतिपदा कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त-महत्त्व

Diwali Padwa 2023 :  दिवाळी पाडवा यंदा कधी आहे? काय आहे शुभ मुहूर्त, जाणून घ्या सविस्तर माहिती… 

Harshada Shirsekar | Published : Nov 13, 2023 7:45 AM IST / Updated: Nov 13 2023, 01:23 PM IST

Diwali Padwa 2023 : हिंदू धर्मामध्ये दीपोत्सवास अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा - प्रकाशाचा सण. नरक चतुर्दशी म्हणजे पहिल्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करून व कारेटे फोडून दिवाळी सणास प्रारंभ केला जातो. संध्याकाळी देवी महालक्ष्मी व कुबेर देवाची पूजन करण्याचीही परंपरा आहे. 

दिवाळी पाडवा 2023

दिवाळीतील पाडवा (Diwali Padwa 2023 Significance And Date) या सणालाही विशेष असे महत्त्व आहे. या दिवसापासून विक्रम संवत सुरू होतो. म्हणून यास ‘दिवाळी पाडवा’ (Diwali Padwa 2023) असे म्हणतात. हिंदूंच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे. या दिवशी पत्नीने पतीला ओवाळून पाडवा साजरा करण्याचीही परंपरा आहे. यंदा दिवाळी पाडवा नेमका कधी आहे व शुभ मुहूर्त याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…

दिवाळी पाडवा कधी आहे? (Kadhi Ahe Diwali Padwa?)

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवाळी पाडवा सण यंदा 14 नोव्हेंबरला म्हणजे मंगळवारी साजरा केला जाणार आहे. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी 06 वाजून 14 मिनिटांपासून ते संध्याकाळी 08 वाजून 35 (Diwali Padwa 2023 Shubh Muhurat) मिनिटांपर्यंत असणार आहे.

दिवाळी पाडवा का मानला जातो शुभ? ( Diwali Padwa Ka Manala Jato Shubh?)

दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोने, चांदी, नवीन घर, नवीन वाहन किंवा अन्य मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. व्यापारीवर्ग या दिवशी आपल्या जमा-खर्चाच्या वह्या, पेन अशा व्यापाराशी संबंधित वस्तूंचीही पूजा करतात. पाडव्याच्या दिवसापासूनच व्यापारी वर्ग आपल्या नवीन वर्षांचा आरंभ करतात. या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षणही करते. तर पतीने पत्नीला पाडव्याची भेटवस्तू देण्याचीही पद्धत आहे.

बलिप्रतिपदेची पूजा का केली जाते? (Kadhi Ahe Balipratipada? Balipratipada Katha)

Bali Pratipada 2023 Significance And Date : बलिप्रतिपदेची पूजाही (How To Celebrate Balipratipada?) 14 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. सद्‌गुणी, प्रजेची काळजी घेणारा व सामर्थ्यशाली अशी बळीराजाची ख्याती होती. पुराण कथेनुसार हा दानशूर राजा कोणत्याही गोष्टीचे दान करताना कधीही मागे-पुढे पाहत नसे. या दिवशी भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन बळीराजाला (Diwali Balipratipada 2023 Date) पाताळात लोटले, अशी कथा (Balipratipada Mythological Story) आहे.

एकदा त्याने यज्ञ केला. त्यावेळेस भगवान विष्णू (Bhagwan Vishnu) बटू वामनाचा अवतार (Batu Vaman Avtar) घेऊन प्रकट झाले व त्यांनी बळीराजाकडे तीन पाऊल जमीन भिक्षा म्हणून मागितली. बळीराजाने कोणताही विचार न करता त्यांना हे दान दिले. दान मिळाल्यानंतर वामनाने विराट रूप धारण केले व पहिल्या पावलाने पृथ्वी तर दुसऱ्या पावलाने संपूर्ण अंतराळ व्यापून घेतले.

यानंतर बटूने तिसरे पाऊल कुठे ठेवू?अशी विचारणा केली असता बळीराजाने 'ते माझ्या मस्तकावर ठेव' असे सांगितले. अशा पद्धतीने वामनाने बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळी पाठवल्याची कथा (Balipratipada Story In Marathi) आहे. यानंतर पाताळात बळीराजाचे राज्य स्थापन झाले. पण पाताळात जाण्यापूर्वी पृथ्वीवर दरवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे, असा वर मागितला. वामनाने हा वर बळीराजाला दिला. 

म्हणूनच दरवर्षी कार्तिक शुद्ध प्रतिपदेस 'बलिप्रतिपदा' (Balipratipada 2023) साजरी केली जाते व 'इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो' (Bali Puja 2023 Date) अशी प्रार्थनाही केली जाते.

आणखी वाचा : 

पूजेनंतर लक्ष्मीदेवीची प्रतिमा कुठे ठेवावी? लक्षात ठेवा 5 गोष्टी

Bhaubeej 2023: भाऊबीज कधी आहे? 14 की 15 नोव्हेंबर? जाणून योग्य तिथि, मुहूर्त, पूजा विधि व महत्त्व

Diwali 2023 Remedies : धनलाभासाठी दिवाळीत करा हे 10 उपाय

Share this article