अस्वच्छ Travel Luggage Bag घरच्याघरीही करता येईल स्वच्छ, वापरा या सोप्या ट्रिक्स

Published : Sep 18, 2024, 08:34 AM IST
Travel Bag

सार

प्रवासानंतर तुमची ट्रॅव्हल बॅग अस्वच्छ आणि मळली असल्यास चिंता करण्याची गरज नाही. कारण घरच्याघरी काही सोप्या ट्रिक्सच्या मदतीने अस्वच्छ झालेली सामानाची बॅग स्वच्छ करु शकता.

Travel Luggage Bag Cleaning Tips :  लॉन्ग ट्रिपनंतर आपले शरीर थकण्यासह बॅगही अस्वच्छ होते. यावेळी बॅगवर धूळ-माती चिकटली जाते. अशातच घरी आल्यानंतर अस्वच्छ झालेली ट्रॅव्हल बॅग स्वच्छ करणे कठीण वाटते. प्रवासानंतर मळलेली लगेज बॅग स्वच्छ करण्यासाठी पुढील काही सोप्या ट्रिक्स जाणून घेऊया...

ट्रॅव्हल बॅग स्वच्छ करण्यासाठी लागणारी सामग्री

  • गरम पाणी
  • लिक्विड डिटर्जेंट
  • मऊ ब्रश अथवा टुथब्रश
  • टूथपेस्ट
  • सुती कापड
  • रिकामी केलेली ट्रॅव्हल बॅग

बाहेरचा भाग स्वच्छ करा

  • ट्रॅव्हल बॅग स्वच्छ करण्यासाठी याचा बाहेरील भाग सर्वप्रथम स्वच्छ करा.
  • सुती कापड हलका ओलसर करत पुसून घ्या. यासाठी साबणाचे पाणी वापरा.
  • बॅगच्या मळलेल्या ठिकाणी व्यवस्थितीत पुसून घ्या.
  • बॅगवरील अस्वच्छ डाग निघत नसल्यास मऊ ब्रशने घासून पाहा.
  • अखेर बॅग व्यवस्थितीत पुसून घ्या.

बॅगच्या आतमधील स्वच्छता

  • बॅगच्या आतमधील भाग स्वच्छ करण्यासाठी वॅक्यूम क्लिनरची मदत घेऊ शकता. यामुळे धूळ आणि माती निघून जाईल.
  • बॅगेवर डाग लागला असल्यास तो काढण्यासाठी शॅम्पूचा वापर करू शकता.
  • शॅम्पूचे पाण्यात मिक्स करुन त्यामध्ये कापड ओलसर करुन घ्या.
  • ओलसर कापडाने बॅग आतमधून व्यवस्थितीत पुसून घ्या.
  • अखेर बॅग वाळण्यासाठी उन्हात ठेवून द्या.

बॅगवरील डाग निघतच नसल्यास

  • ट्रॅव्हल बॅगमध्ये एखादी क्रिम अथवा तेलाचा डाग लागला असल्यास तो काढण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करू शकता.
  • लिंबूचा रस डाग लागेल्या ठिकाणी 10-15 मिनिटे ठेवून द्या.
  • तरीही डाग जात नसल्यास त्यावर ब्लिचिंग पावडरचा वापर करा.
  • ब्लिचिंग पावडरवर टुथब्रशचा वापर करून स्वच्छ करा.

आणखी वाचा : 

केवळ 10 मिनिटांमध्ये Eyebrow Makeup करण्यासाठी 6 सोप्या टिप्स

पिंपळाच्या झाडाला वृक्षांचा देव का म्हणतात?

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

Recommended Stories

Guru Adhisara Peyarchi 2026 : गुरु अतिचार गोचर! या ३ राशींचे नशीब पालटणार, सुरू होणार सुवर्णकाळ?
Breast Cancer: ब्रा घातल्याने खरंच ब्रेस्ट कॅन्सर होतो का? जाणून घ्या सत्य