Balcony Gardening : बाल्कनीत लावा या 9 सोप्या भाज्या, उन्हाळाभर मिळेल ताजा भाजीपाला!

Published : Apr 07, 2026, 01:00 PM IST

Balcony Gardening : तुमच्या बाल्कनीत किंवा छोट्या गार्डनमध्ये कोणत्या भाज्या लावाव्यात, असा प्रश्न पडलाय? आम्ही तुम्हाला अशा 9 भाज्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही अगदी सहज लावू शकता. 

PREV
16
भाजीपाला लावण्यासाठी मोठी जागा

आपल्याला नेहमी वाटतं की, भाजीपाला लावण्यासाठी मोठी जागा लागते, पण तसं नाही. तुम्ही तुमच्या छोट्याशा बाल्कनीतही छान बाग फुलवू शकता. थोडंसं ऊन, नियमित पाणी आणि थोडा धीर धरला की तुम्ही घरच्या घरी किचन गार्डन सुरू करू शकता. उन्हाळ्यात बाल्कनीत सहज वाढणाऱ्या काही भाज्यांबद्दल जाणून घेऊया.

26
वांगी (Brinjal) / पुदिना (Mint)

 वांग्याचं रोप सेट व्हायला थोडा वेळ लागतो, पण एकदा वाढलं की भरपूर वांगी मिळतात. याला थोडी मोठी कुंडी आणि चांगलं ऊन लागतं. उन्हाळ्यात वांग्यांना चांगलं फळ येतं. तर पुदिना उन्हाळ्यासाठी बेस्ट आहे. तो खूप वेगाने पसरतो, त्यामुळे त्याला वेगळ्या कुंडीत लावलेलं बरं. तुम्ही त्याची पानं तोडत राहा, तो पुन्हा उगवत राहील.

36
दुधी भोपळा (Bottle Gourd)

दुधी भोपळ्याच्या वेलाला वाढायला थोडी जास्त जागा आणि आधार लागतो. हा वेल टेरेस किंवा मोठ्या बाल्कनीसाठी उत्तम पर्याय आहे. उन्हाळ्यात ही भाजी खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. 

46
टोमॅटो (Tomato) / पालक (Spinach)

बागकाम सुरू करणाऱ्यांसाठी टोमॅटो हा सर्वोत्तम पर्याय आहे. विशेषतः चेरी टोमॅटो लहान कुंड्यांमध्ये सहज उगवतात. चांगलं ऊन आणि नियमित पाणी मिळालं की ते वेगाने वाढतात आणि लवकर फळं देऊ लागतात. दुसरीकडे, पालक ही भाजी कमी देखभालीत वेगाने वाढते. तुम्ही त्याची काही पानं तोडून वापरू शकता आणि बाकीचं रोप वाढत राहतं. लहान कुंड्यांमध्येही पालक सहज येतो.

56
कोथिंबीर (Coriander) / मेथी (Fenugreek)

कोथिंबीर लवकर उगवते, पण एक-दोनदा कापल्यावर ती संपते. त्यामुळे दर काही आठवड्यांनी नवीन बियाणं पेरणं चांगलं. नंतर तुम्ही या बियांचा वापरही करू शकता. मेथी तर काही आठवड्यांतच तयार होणारी भाजी आहे. ही भाजी लावणं खूप सोपं आहे आणि लहान कुंड्यांसाठी एकदम परफेक्ट आहे.

66
हिरवी मिरची (Green Chilli) / भेंडी (Ladyfinger/Okra)

हिरव्या मिरचीचं रोपटं जास्त जागा घेत नाही, पण ते दीर्घकाळ फळं देतं. थोडी काळजी आणि ऊन मिळाल्यास ते सहज वाढतं आणि तुमच्या रोजच्या गरजा पूर्ण करतं. तर भेंडीला भरपूर ऊन लागतं. तुमच्या बाल्कनीत चांगलं ऊन येत असेल, तर भेंडीचं रोप झपाट्याने वाढेल. तुम्ही नियमितपणे भेंडी तोडल्यास, झाडाला आणखी फळं येतात. 

Read more Photos on

Recommended Stories