मुंबई : महाराष्ट्रात २५ जुलै रोजी श्रावण मास सुरु होणार आहे. श्रावण म्हणजे महिलांचा हक्काचा सण. श्रावणात पैठणीला पसंती दिले जाते. पण तिच तिच नथ घालण्याचा कंटाळा आला असेल तर ही स्टायलिश नोज रिंग ट्राय करुन बघा. तुम्ही दिसाल ट्रेंडी.
तरुणींपासून विवाहित महिलांपर्यंत सगळ्यांनाच नोज पिन आवडतात. तुम्हालाही १-२ हजार रुपयांपर्यंतची गोल्ड नोज पिन हवी असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास डिझाइन्स घेऊन आलो आहोत.
26
साधी सोनेरी नोज रिंग
१ हजार रुपयांपर्यंत हलक्या सोनेरी तारेवर अशी साधी नोज रिंग मिळू शकते. ही सगळ्या चेहऱ्यांवर छान दिसते. ऑफिसला जाताना साध्या दागिन्यांचा शोध असेल तर ही एक चांगली निवड.
36
अॅडजस्टेबल गोल्ड नोज पिन
विवाहित महिलांना भडक दागिने जास्त छान दिसतात. इथे गोल तारेला पाच नग जोडले आहेत. लग्न-समारंभात हलकी नोज पिन घालता तर आता ती बदलण्याची वेळ आली आहे.
तरुणी नग वर्क असलेल्या गोल्ड नोज रिंगची निवड करू शकतात. ही खूपच सुंदर दिसते. २ हजार रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये ही सोनाराकडे मिळू शकते. रोजच्या वापरासाठी आणि मिनिमल लुकसाठी ही परफेक्ट आहे.
56
पान आकाराची नोज पिन
लांब आणि पातळ चेहरा असेल तर गोल नोज पिन टाळा. त्याऐवजी पान आकाराची नोज पिन वापरा. ही हलकी असून चेहऱ्याला सुंदर दाखवते. १-२ हजार रुपयांत सोनाराकडे किंवा ऑनलाइन मिळू शकते.
66
स्टायलिश सोनेरी नोज पिन
विवाहित महिला रोजच्या वापरासाठी अशी आयबॉल नोज पिन वापरू शकतात. ही खूप सुंदर दिसते. काहीतरी वेगळं घालायचं असेल तर यापेक्षा चांगला पर्याय मिळणं कठीण.