Marathi

महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? घ्या जाणून

Marathi

महाशिवरात्री 2025

येत्या 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. अशातच शंकराच्या मंदिरात जाऊन मोठ्या पूजा-प्रार्थना केली जाते. जाणून घेऊया महाराष्ट्रातील काही ज्योतिर्लिंगांबद्दल अधिक…

Image credits: social media
Marathi

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग- त्रिंबक, नाशिक

 त्र्यंबकेश्वर मंदिर हे सर्वात पवित्र स्थळांपैकी एक मानले जाते. हे भगवान शिवाच्या भक्तांसाठी एक प्रमुख तीर्थस्थळ आहे. हे मंदिर नाशिक विमानतळापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे.

Image credits: Getty
Marathi

श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग - भीमाशंकर, पुणे

भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते. हेमाडपंती पद्धतीचे हे मंदिर आहे.

Image credits: Getty
Marathi

श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग - छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र

श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये मिळतो, जसे की शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण आणि महाभारत.हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थळांपैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे.

Image credits: Getty
Marathi

श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग - परळी, बीड

परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैद्यनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे.

Image credits: Getty
Marathi

श्री नागनाथ ज्योतिर्लिंग - औंढा, हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग हे जग प्रसिद्ध आहे. औंढा नागनाथ येथील जोतिर्लिंग शंकराचं येथील मंदिर हे पाच हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. 

Image credits: Getty
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty

सांसद प्रवेश वर्मा यांची कन्या सनिधि: शिक्षण ते जीवनशैली

कैरीचे लोणचे घरच्या घरी कसे बनवावे, माहिती जाणून घ्या

मुलीला इम्प्रेस करण्यासाठी काय करावं, चाणक्य नीती काय सांगत?

दररोज उलट चालण्याचे भन्नाट फायदे, मानसिक आरोग्यही सुधारेल