Fashion Tips सावधान! तुम्हीही नवीन कपडे न धुताच परिधान करता? होतील हे गंभीर परिणाम

Fashion Tips नवीन कपडे खरेदी केले की ते स्वच्छ न धुताच परिधान (Why You Should Wash Your New Clothes) करण्याची अनेकांना सवय असते. पण यामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतात, हे तुम्हाला माहिती आहे का? 

Harshada Shirsekar | Published : Oct 3, 2023 3:18 PM / Updated: Nov 21 2023, 11:23 AM IST
19
नवे कपडे न धुताच परिधान करता?

New Clothes Hygiene Tips : नवीन कपडे खरेदी केल्यानंतर (why you should wash new clothes) ते स्वच्छ न धुताच तसेच परिधान करताय का? तर मग तुम्हाला याची किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. किंमत म्हणजे तुम्हाला यासाठी काही पैसे वगैरे मोजावे लागणार नाहीयेत. तर या चुकीच्या सवयीमुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

29
नवीन कपडे धुणे गरजेचं आहे?

आता तुम्हाला असा प्रश्न पडला असावा की, नव्याकोऱ्या कपड्यांमुळे आरोग्यास कसा काय धोका निर्माण होऊ शकतो? नवीन कपडे धुण्याची गरजच काय? तर मंडळींनो, आरोग्यास अपाय होऊ नये, असे वाटत असल्यास नवीन कपडे परिधान (How To Wash Brand New Clothes) करण्यापूर्वी ते स्वच्छ धुणे अतिशय आवश्यक आहे. जाणून घेऊया या मागील कारणे सविस्तर

39
ट्रायल रूम

तुम्ही खरेदी केलेले कपडे तुमच्या आधीही अनेकांनी ट्रायल रूममध्ये परिधान करून पाहिलेले असतात. या व्यतिरिक्त ग्राहक अनेकदा त्यांना न आवडलेले किंवा फिट न बसलेले कपडे ट्रायल रूममधील हुक्स हँगरवर (Cloth Hooks Hanger) न अडकवता ते जमिनीवर ठेवतात. ज्यामुळे जमिनीवरील धूळ-माती व घाण कपड्यांना लागते.

49
संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी घ्यावी काळजी

खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक कित्येक ठिकाणाहून प्रवास करून मॉल किंवा दुकानांमध्ये येतात. त्यावेळेस त्यांच्या फुटवेअरची घाण ट्रायल रूमच्या जमिनीवरही पसरते, हे लक्षात घ्या मित्रांनो आणि याच जमिनीवर पडलेले कपडे आपणही परिधान करून पाहता, ज्यामुळे आरोग्य तसंच त्वचेशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. विशेषतः संवेदनशील त्वचा (Skin Care Tips In Marathi) असणाऱ्यांनी नवीन कपडे स्वच्छ धुऊन त्यानंतरच परिधान करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

59
त्वचेशी संबंधित समस्या

नवीन कपडे स्वच्छ न धुता वापरल्यास त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ त्वचा लाल होणे (Sensitive Skin Care Tips) , त्वचेशी संबंधित अ‍ॅलर्जी होणे, पुरळ-मुरूम येणे, त्वचेला खाज सुटणे, इत्यादी.

69
वापरलेले कपडे पुन्हा करणे

हे सर्व काही ट्रायल रूमपर्यंतच मर्यादित राहत नाही. काही ग्राहक तर अनेकदा लेबल न काढताच जसेच्या तसे कपडे (Hygiene Tips For New Clothes) परिधान करतात आणि काही तरी कारण सांगून तेच कपडे दुकानदारांना पुन्हा देतात. ऑनलाइन खरेदीमध्ये असे प्रकार घडणे फार सामान्य आहे. समजा आपण कळत-नकळत अशाच पद्धतीचे कपडे खरेदी केले तर खबरदारी म्हणून सर्वप्रथम ते पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या आणि त्यानंतरच परिधान करा.

79
कपड्यांचा गोदामापासून स्टोअरपर्यंतचा प्रवास

कपड्यांचा गोदामापासून ते स्टोअरपर्यंतच्या प्रवासादरम्यान स्वच्छतेची (Hygiene Tips For New Clothes In Marathi) काळजी घेतली जात असेलच,असे नव्हे. एखाद्या अस्वच्छ किंवा घाण वास येणाऱ्या बॉक्समध्ये हे कपडे भरून नेले जातात. यादरम्यान कपड्यांचं पॅकिंग फाटण्याच्याही घटना घडतात. परिणामी कपड्यांवर घाण जमा होते.

89
रंगीबेरंगी कपड्यांसाठी वापरले जाणारे केमिकल

वेगवेगळ्या रंगाचे कपडे तयार करण्यासाठी केमिकल्सचा वापर केला जातो. ज्यामध्ये आरोग्यास अपायकारक असणाऱ्या काही विषारी घटकांचा समावेश असतो. यामुळे त्वचेवर रॅशेज् येणे (Skin Care Tips In Marathi) इत्यादी समस्या उद्भवू शकतात आणि बहुतांश वेळेस या समस्यांमुळे आरोग्यावर दीर्घकाळासाठी परिणाम होऊ शकतात.

99
या गोष्टी लक्षात ठेवा

तर नवीन खरेदी केलेले कपडे स्वच्छ धुणे का आवश्यक आहे? याचे उत्तर आपणास या माहितीद्वारे समजले असावे. या गोष्टी लक्षात ठेवा आणि नवीन कपडे परिधान करण्यापूर्वी नक्की स्वच्छ धुऊन घ्या.

आणखी वाचा

White Hair Solution : पांढऱ्या केसांपासून हवीय मुक्तता? मग करा हे आयुर्वेदिक उपाय

Saat Kappyache Ghavane : सात कप्प्यांचे घावणे, जाणून घ्या कोकणातील पारंपरिक रेसिपी

सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाण्याचे जबरदस्त फायदे

Share this Photo Gallery
Recommended Photos