दीर्घकाळ बसून राहिल्याने हाडांच्या आरोग्यांवर होतो परिणाम, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात

Published : Apr 08, 2025, 08:14 AM ISTUpdated : Apr 08, 2025, 08:16 AM IST
Regular walk can reduce lower back pain

सार

दिवसभर बसून काम करत असाल तर पाठीच्या मणक्यासह शरीरातील हाडांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होतो. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.

Health Care Tips : सध्याची धावपळीचे आयुष्य आणि बिघडलेली लाइफस्टाइल पाहता त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. यामुळेच मानसिक आणि शारीरिक त्रास देखील काहीवेळेस उद्भवला जातो. दिवसभर बसून राहिल्याने शरीराची हालचाल होत नाही. यामुळे हार्मोनल समस्या, कंबरदुखी अशा समस्या वाढल्या जातात. ही समस्या हाडांसंदर्भातील समस्यांचे कारण ठरू शकते. पण दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून काम केल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो हे सविस्तर जाणून घेऊया.

हाडांची स्ट्रेंथ कमी होते

दीर्घकाळ बसून राहिल्याने त्याचा हाडांच्या स्ट्रेंथवर परिणाम होतो. खरंतर, शरीरातील हाडं आणि स्नायू दीर्घकाळ बसून राहण्याची स्थिती सावरू शकत नाही, जे हाडांच्या स्ट्रेंथसाठी महत्वाचे आहे. पण यामध्ये समतोल साधला जात नसल्याने हाडांची स्ट्रेंथ हळूहळू कमी होऊ लागते.

हाडांची घनता कमी होणे

हाडांचे आरोग्य राखण्यासाठी शरीराची हालचाल होणे फार महत्वाचे आहे. यासाठी थोडावेळ चालणे, हलका व्यायाम करावा. जेणेकरुन हाडांची घनता कायम टिकून राहण्यासह बळकट होतील. पण दिवसभर हाडांची हालचाल न झाल्यास काळासह हाडांची घनता कमी होऊ लागते.

ऑस्टियोपोरोसिसचा धोका

दीर्घकाळ बसून राहिल्याने कंबर आणि हिप्सच्या येथील स्नायू कमकुवत होण्यास सुरू होतात. हे स्नायू शरीराचा भार सांभाळण्यासाठी फार महत्वाचे असतात. अशातच हाडांना सपोर्ट न मिळाल्यास ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढला जातो.

सांधेदुखी आणि कंबरदुखीचे कारण

चुकीच्या पॉश्चरमध्ये दीर्घकाळ बसून राहिल्याने पाठीचा मणका आणि सांध्यांवर त्याचा परिणाम होतो. अशातच सांधेदुखी आणि कंबरदुखी होऊ लागते. याशिवाय शारीरिक हालचाल न झाल्यास शरीरातील ब्लड सर्कुलेशनची प्रक्रियाही मंदावली जाते.

तज्ज्ञ काय म्हणतात?

शरीरातील हाडांच्या आरोग्यासाठी सातत्याने एकाच ठिकाणी बसून राहणे टाळा. प्रत्येक अर्धा किंवा एक तासानंतर ब्रेक घ्या. कामामध्ये थोडावेळ उठून फिरुन या. अथवा स्ट्रेचिंग करू शकता. शरीराची हालचाल होण्यासाठी आपल्या डेली रुटीनमध्ये हलकी एक्सरसाइज, वॉक किंवा योगा करा. याशिवाय कॅल्शियम आणि न्यूट्रिशनयुक्त डाएटचे सेवन करा. जेणेकरुन हाडांचे आरोग्य राखले जाईल.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

PREV

Recommended Stories

फक्त ७ डिझाईन्स! जडाऊ गोल्ड प्लेटेड इअरिंग्ज जे प्रत्येक लुकला देतील रॉयल टच; तुम्हीही लगेच ट्राय करा!
घरीच पिकवा, ताजी खा! हिवाळ्यात कमी कष्टात आणि कमी जागेत येणाऱ्या 'या' ७ सुपर हेल्दी भाज्या!