अनेकदा तुमचा मोबाईल फोन गरम होणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. फोन जास्त गरम होणे हे धोकादायकही आहे. तुमचा फोन जास्त गरम होण्यापासून रोखण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी मार्ग जाणून घेऊया.
बॅकग्राउंडमध्ये चालणारे ॲप्स फोनवर लोड टाकतात आणि उष्णता वाढवतात. त्यामुळे, तुमचा फोन गरम होऊ लागल्यास, अनावश्यक ॲप्स लगेच बंद करा. यामुळे उष्णता लवकर कमी होण्यास मदत होईल.
26
२. स्क्रीनची ब्राइटनेस कमी करा
जास्त ब्राइटनेसमुळे बॅटरीवर दाब येतो आणि फोन गरम होतो. ब्राइटनेस कमी ठेवा. स्क्रीन टाइमआउटचा वेळही कमी करा. अँटी-ग्लेअर स्क्रीन प्रोटेक्टर वापरल्यास उन्हात स्क्रीन पाहणे सोपे होते.
36
३. फोनचे कव्हर काढून टाका
जाड कव्हरमुळे उष्णता बाहेर जाण्यास अडथळा येतो. त्यामुळे तुमचा फोन जास्त गरम होत असेल, तर लगेच कव्हर काढून टाका. यामुळे उष्णता कमी होण्यास मदत होते.