थंडीच्या दिवसात गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीर स्वच्छ होण्यासह मानसिक आरामही मिळतो. पण थंडीत उच्च रक्तदाब किंवा हृदयासंबंधित समस्या असलेल्या रुग्णांनी काय करावे याबद्दल जाणून घेऊया...
Hot bath in winter advantages and disadvantages : थंडीच्या दिवसात गरम पाण्याचा वापर केला जातो. यामुळे शारिरीक आणि मानसिक तणाव दूर होतो असे मानले जाते. पण गरम पाण्याने आंघोळ करण्यासह काही नुकसानही होते. खासकरुन, उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी आंघोळीवेळी गरम पाण्याच्या तापमानाकडे लक्ष देणे फार महत्वाचे असते. जाणून घेऊया थंडीत गरम पाण्याने आंघोळ करावी का याबद्दल सविस्तर...
गरम पाण्याने आंघोळ केल्याने होणारे फायदे
गरम पाण्याने आंघोळ केल्याने शारिरीक आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.
स्नायूंचे दुखणे कमी होत शारिरीक आराम मिळतो.
शरिराला सुरळीत रक्तपुरवठा सुरू राहतो. यामुळे शरिरातील सर्व अवयवांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषण तत्त्वे व्यवस्थितीत पोहोचली जातात.
गरम पाण्याने आंघोळ केल्याने पोर्स उघडले जात त्यामधील घाण बाहेर येते. यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.
गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरिराचे अवयव रिलॅक्स होतात.
गरम पाण्याने आंघोळ केल्याने होणारे नुकसान
गरम पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेमधील नैसर्गिक ओलसरपणा दूर होतो. यामुळे त्वचा कोरडी होते.
शरिराचे तापमान वाढल्यास बीपी वाढला जाऊ शकतो. कडक गरम पाण्याने आंघोळ करणे हृदयासंबंधित समस्या आणि बीपीच्या रुग्णांसाठी जीवघेणे ठरू शकते.
कडक गरम पाण्याने आंघोळ केल्याने काहींमध्ये चक्कर येण्याची समस्या उद्भवू शकते.
पाण्याचे योग्य तापमान
थंडीत आंघोळीसाठी पाण्याचे तापमान अधिक थंड किंवा गरम नसावे. यावेळी कोमट गरम पाण्याचा आंघोळीसाठी वापर करावा. कडक गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचा कोरडी होणे ते उच्च रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो. गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर त्वचेला मॉइश्चराइजर लावणे फार महत्वाचे आहे. जेणेकरुन त्वचेमध्ये ओलरपणा टिकून राहिल.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.