Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
वयाच्या चाळीशीत आनंदी रहा
वाढत्या वयासह आजार मागे लागण्यासह काही काम करतानाही उत्साह येत नाही. अशातच स्वत: ला हेल्दी आणि उत्साही ठेवण्यासाठी वयाच्या चाळीशीत कोणती कामे करावीत याबद्दल पुढे जाणून घेऊया...
Image credits: Social Media
Marathi
अश्वगंधाचे सेवन करा
औषधीय गुणांनी समृद्ध असणाऱ्या अश्वगंधाचे सेवन करू शकता. यामुळे स्टॅमिना उत्तम राहण्यासह शरिराला उर्जा देण्यास मदत होते. पण अश्वगंधाचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने करा.
Image credits: social media
Marathi
दररोज व्यायाम करा
वाढत्या वयासह उत्साह कायम टिकून राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. यामुळे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल.
Image credits: Social media
Marathi
हेल्दी डाएट फॉलो करा
वाढत्या वयासह उत्साही राहण्यासाठी पोषण तत्त्वांनी समृद्ध असे दूध, डेयरी, हिरव्या पालेभाज्या आणि फळांचे सेवन करा.
Image credits: Instagram
Marathi
अल्कोहोल आणि धुम्रपान करणे टाळा
वाढत्या वयासह स्टॅमिना आणि उर्जा टिकवून ठेवण्यासाठी धुम्रपान आणि अल्कोहोलच्या सेवनापासून दूर राहा. यामुळे आरोग्याला नुकसान पोहचले जाते.
Image credits: freepik
Marathi
पुरेशी झोप घ्या
हेल्दी आणि उत्साही राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे फार महत्वाचे आहे.
Image credits: Social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.