लठ्ठपणा नियंत्रणात ठेवणे सोपे नाही. यासाठी हेल्दी लाइफस्टाइल रुटीन आणि एक्सरसाइज करणे फार महत्वाचे आहे. अशातच लठ्ठपणाच्या समस्येने तुम्ही त्रस्त असल्यास सकाळच्या 5 सवयी नक्कीच लठ्ठपणावर नियंत्रण मिळवण्यास मदत करतील.
Obesity Control Tips : लठ्ठपणा सध्याच्या घडीला सर्वाधिक मोठे आव्हान आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि हृदयासंबंधित काही गंभीर आजार होण्याची शक्यता असते. वजन कमी करण्यासाठी काहीजण जिम ते अन्य काही गोष्टी करतात. खरंतर, लठ्ठपणापासून दूर राहण्यासाठी हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करणे सर्वाधिक महत्वाचे आहे. जाणून घेऊया सकाळच्या कोणत्या 5 सवयींमुळे लठ्ठपणावर नियंत्रण मिळवता येईल याबद्दल सविस्तर...
सकाळच्या नाश्तामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश असावा. प्रोटीनमुळे भूक लागणाऱ्या हार्मोनवर नियंत्रण राहते. यासाठी डाएटमध्ये अंडी, ग्रीक योगर्ट, पनीर आणि नट्सचा समावेश करा. यामुळे ओव्हर इटिंगपासून दूर रहाल.
सकाळी स्वत:ला हाइड्रेट ठेवल्याने शरिराचा मेटाबॉलिज्मची क्रिया वेगाने होऊ शकते. संपूर्ण दिवसभर थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यासह शरिरातील उर्जा वाढली जाते.
सुदृढ राहण्यासाठी दररोज सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये चालायला जा. यामुळे शरिराला व्हिटॅमिन डी मिळण्यासह बॉडी फॅट्स कमी होण्यास मदत होईल.
दररोज व्यायाम करण्यासाठी एक वेळ निवडा. व्यायाम केल्याने ब्लड शुगरचा स्तर नियंत्रणात राहतो. यासाठी योगाभ्यास किंवा हलकी एक्सरसाइज करू शकता.
लठ्ठपणापासून दूर रहायचे असल्यास घरच्याघरी तयार करण्यात आलेल्या अन्नपदार्थांचे सेवन करावे. यामुळे वजन नियंत्रणात राहिल आणि लठ्ठपण वाढण्याची शक्यता कमी होईल.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
वयाच्या चाळीशीत उत्साही राहण्यासाठी करा ही कामे
केसांच्या समस्या होईल दूर, हिवाळ्यात कोरफड जेल वापरण्याचे 6 फायदे!