Shravan 2025 : श्रावण महिन्यात या 5 चुका करणे टाळा, अन्यथा भगवान शंकर होतील नाराज

Published : Jul 12, 2025, 01:53 PM IST

मुंबई : श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यामध्ये भगवान शंकराची मोठ्या भक्ती भावाने पूजा-प्रार्थना केली जाते. याशिवाय  श्रावणी सोमवारचेही या महिन्यात फार महत्व आहे. तर जाणून घेऊया श्रावण महिन्यात कोणत्या चुका करणे टाळाव्यात. 

PREV
16
श्रावण महिन्याचे महत्व

श्रावण महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र, सात्त्विक आणि भक्तिभावाने भरलेला मानला जातो. हा महिना मुख्यतः भगवान शिवाच्या उपासनेसाठी प्रसिद्ध आहे. या काळात भक्त उपवास, अभिषेक, रुद्राभिषेक, जप-तप, शिवलिंगाची पूजा करतात. परंतु, पवित्र आणि धार्मिक महत्व असणाऱ्या श्रावण महिन्यात काही चुका केल्यास आयुष्यासाठी वाईट ठरू शकतात. त्यासोबत भगवान शंकर देखील नाराज होऊ शकतात.  

26
मांसाहार आणि मद्यपान टाळा

श्रावण महिन्यात शुद्ध सात्विक लाइफस्टाइल पाळावे असे धर्मग्रंथांत सांगितले आहे. यामुळे श्रावणात मांसाहार, मद्यपान, सिगारेट, तंबाखू यांसारख्या तामसी आणि तमोगुणी सवयी टाळाव्यात. या गोष्टींमुळे आरोग्यालाच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक प्रगतीलाही अडथळा निर्माण करतात. श्रावण महिन्यात शरीरशुद्धी आणि आत्मशुद्धीचा उद्देश ठेवला जातो. 

36
कांदा-लसूण वर्ज्य

हिंदू धर्मानुसार कांदा आणि लसूण यांना तामसी पदार्थ मानले गेले आहे. श्रावण महिन्यात उपवास किंवा पूजेच्या दिवशी कांदा-लसूण वापरणे वर्ज्य आहे. या महिन्यात सात्त्विक आहाराचं महत्त्व अधिक असल्यामुळे शक्यतो फळाहार किंवा हलका अथवा सत्वयुक्त आहाराचे सेवन करावे. 

46
शिवलिंगावर सुकलेली फुले वाहू नका

शिवपूजेमध्ये पवित्रता आणि स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. सुकलेली फुले शिवलिंगावर वाहू नयेत. तसेच, बेलपत्रावर जर छिद्र असेल तर तेदेखील अर्पण करू नका. पवित्र मनाने निवडलेली स्वच्छ फुलेच भगवान शिवाला अर्पण करावीत.

56
राग, वाद-विवाद, अपशब्द टाळा

श्रावण महिन्यात आंतरिक स्वच्छता आणि संयम देखील महत्वाचा असतो. रागावणे, अपशब्द वापरणे, दुसऱ्यांवर टीका करणे, मत्सर किंवा द्वेष वाढवणारे वर्तन करणे श्रावणात काळात टाळावे. यामुळे मनावर नकारात्मक परिणाम होतो आणि साधनेचा उद्देश नष्ट होतो.

66
स्नान न करता पूजा करणे टाळा

श्रावणात दररोज स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करूनच पूजा करावी. अस्वच्छता, अस्ताव्यस्त कपडे किंवा अपवित्र अवस्थेत देवपूजा करणे चुकीचे मानले जाते. विशेषतः शिवपूजेमध्ये अंग शुद्ध असणे महत्वाचे आहे. 

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read more Photos on

Recommended Stories