Shravan 2024 : श्रावणात भगवान शंकरांची अशी करा पूजा, प्रसन्न होतील भोलेनाथ

Shravan 2024 : येत्या 5 ऑगस्टपासून श्रावणाची सुरुवात होणार आहे. या काळात अनेक सण-उत्सवांसह उपवास आणि भगवान शंकर-पार्वतीच्या पूजेला फार महत्व असते. उद्यापासून सुरु होणाऱ्या श्रावणात भगवान शंकरांची पूजा कशी करावी याबद्दल जाणून घेणार आहोत.

 

Chanda Mandavkar | Published : Aug 4, 2024 10:34 AM / Updated: Aug 04 2024, 10:37 AM IST
15
श्रावणात भगवान शंकरांची पूजा-विधी

Shravan 2024 Lord Shiva Puja-Vidhi : भगवान शंकरांना समर्पित असणारा श्रावण महिना भोलेनाथ यांच्या भक्तांसाठी अत्यंत खास असतो. संपूर्ण श्रावणात शंकरांची पूजा-प्रार्थना केली जाते. यंदा श्रावणाची सुरुवात 5 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. श्रावणातील सोमवार आणि शनिवारला फार महत्व आहे. या दिवशी बहुतांशजण उपवास करतात. असे म्हटले जाते की, श्रावणातील सोमवारी कुमारीकांनी उपवास केल्यास त्यांना मनासारखा वर मिळतो. याशिवाय वैवाहिक महिलांनी व्रत केल्यास त्यांचे वैवाहिक आयुष्य आनंदी राहते. जाणून घेऊया श्रावणात भगवान शंकरांची पूजा कशी करावी याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

25
श्रावणी सोमवारचे व्रत आणि मुहूर्त

पहिल्या श्रावणी सोमवारवेळी शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी असणार आहे. ही तिथी संध्याकाळी 6 वाजून 03 मिनिटांपर्यंत असून त्यानंतर द्वितिया तिथी लागणार आहे. यावेळी व्यातिपात आणि वरीयान योगही असणार आहे. शिवाय आश्लेषा आणि मघा नक्षत्र आहे.

35
श्रावणातील सोमवारी अशी करा भगवान शंकरांची पूजा
  • श्रावणात भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करा. याशिवाय स्वच्छ कपडे परिधान करा.
  • भगवान शंकरांच्या व्रताचा संकल्प करा.
  • पूजेची सुरुवात भगवान शंकरांना अभिषेक करण्यापासून करा. यानंतर भगवान शंकराला पांढऱ्या रंगातील चंदनाचा टिळा लावा.
  • दूध, फळ आणि मिठाईचा नैवेद्य दाखवत दिवा-धूप घालत शंकरांच्या मंत्रांचा जाप करा.
  • शंकरांच्या पूजेवेळी धतूरा, बेलपत्र आणि भांग जरुर अर्पण करा.
  • पूजेच्या अखेरीस श्रावणी सोमवारची व्रत कथा पठण करत शंकरांची पूजा करा.
  • श्रावणातील सोमवारी सात्विक भोजनाचे सेवन करावे.
45
भगवान शंकरांसाठी म्हणा पुढील मंत्र

ॐ नमः शिवाय॥

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्

उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥

ॐ नमो भगवते रूद्राय।

ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि। तन्नो रुद्रः प्रचोदयात्॥

55
श्रावणात झाले होते समुद्रमंथन

श्रावण महिन्यात समुद्रमंथन झाले होते. खरंतर, भगवान शंकरांनी हलाहल विष प्राशन केल्याने उदयास आलेली आग शांत करण्यासाठी भाविकांकडून श्रावण महिन्यात शंकराला जल अर्पण केले जाते.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Shravan 2024 : महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांचा इतिहास, श्रावणात नक्की करा दर्शन

तब्बल 71 वर्षांनी श्रावणाची सुरुवात आणि शेवट सोमवारीच होणार

Share this Photo Gallery
Recommended Photos