आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती देशभर आदराने साजरी केली जात आहे. स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर त्या सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत होत्या. अन्याय, अज्ञान आणि विषमतेविरोधात उभे राहून त्यांनी समाजाला नवी वाट दाखवली.