Sarva Pitru Amavasya वेळी असणाऱ्या सुर्यग्रहणात श्राद्ध करु शकतो? पाहा तारीख

सर्वपित्री अमावस्येला पितृपक्ष संपतो. या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध घालून त्यांचे आशीर्वाद मिळवले जातात. यंदा सर्वपित्री अमावस्येवेळी सुर्यग्रहणाची स्थिती निर्माण होणार आहे. यामुळे श्राद्ध घालू शकतो का आणि योग्य तारीख काय याबद्दल जाणून घेऊया.

Sarva Pitru Amavasya 2024 Date : अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमावस्येच्या तिथीला सर्वपित्री अमावस्या म्हटले जाते. या दिवशी घरातील सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते. सर्वपितृपक्ष अमावस्येला विशेष महत्व आहे. या दिवशी अशा सर्व पितरांचे श्राद्ध होते ज्यांचे श्राद्ध करणे एखाद्या कारणास्तव राहून गेलेले असते. यंदाच्या सर्वपित्री अमावस्येवेळी सुर्यग्रहण असणार आहे. अशातच जाणून घेऊया यंदा सर्वपित्री अमावस्या कधी असणार, महत्व आणि या काळात श्राद्ध करु शकतो की नाही याबद्दल सविस्तर...

यंदा सर्वपित्री अमावस्या कधी?
हिंदू पंचांगानुसार, अमावस्या तिथीची सुरुवात 1 ऑक्टोंबरला रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी होणार आहे. अमावस्या तिथीची समाप्ती 2 सप्टेंबरला मध्यरात्री 2 वाजून 19 मिनिटांनी होणार आहे. अशातच सर्वपित्री अमावस्या 2 ऑक्टोंबरला असणार आहे.सुर्यग्रहाची सुरुवात 1 ऑक्टोंबरला रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी होणार असून 2 ऑक्टोंबरला मध्यरात्री 3 वाजून 17 मिनिटांनी संपणार आहे.

सर्वपित्री अमावस्येवेळी सुर्यग्रहणामुळे श्राद्ध करता येणार?
सर्वपित्री अमावस्येवेळी लागणारे सुर्यग्रहण भारतात दिसणार नाही आहे. याशिवाय 2 ऑक्टोंबरला सकाळी सुरु होणाऱ्या सुर्यग्रहणाआधी संपणार आहे.भारतात सुर्यग्रहण दिसणार नसल्याने सूतक काळही नसणार आहे. अशातच 2 ऑक्टोंबरला पितरांचे श्राद्ध सर्वपित्री अमावस्येवेळी करता येणार आहे.

सर्वपित्र अमावस्येचे महत्व
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितृपक्षातील अखेरचे श्राद्ध केले जाते. या दिवशी सर्व पितरांच्या नावाने श्राद्ध कर्म केले जाते. याशिवाय ज्या पितरांची श्राद्ध तिथी माहिती नसते त्यांचेही श्राद्ध सर्वपित्री अमावस्येवेळी केले जाते. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण अशी कार्ये केल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Navratri 2024 वेळी या 2 राशींवर राहणार देवी दुर्गेचा आशीर्वाद, नशीबही चमकणार

सिद्धिविनायक ते श्री मुंबादेवी...मुंबईतील 10 प्रसिद्ध मंदिरे

Share this article