
Skin Care Tips : प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. पण काहींना मुरुमे आणि मुरुमांमुळे डाग आल्याने सौंदर्याची तेजी निघून गेल्यासारखी वाटते. याशिवाय त्वचा काळी आणि निर्जीव झाल्यासारखी दिसते. अशा लोकांनी विशेषतः त्वचेची काळजी घेतली पाहिजे. यासाठी घरच्याघरी गुलाबाच्या पाकळ्यांपासून होममेड फेसपॅक तयार करू शकता. याबद्दल खाली सविस्तर जाणून घेऊया.
गुलाबाच्या पाकळ्यांपासून फेसपॅक बनवण्यासाठी मूठभर गुलाबाच्या पाकळ्या घ्या. तसेच मुलतानी माती, मध, कोरफडीचा गर तयार करावा लागेल. प्रथम गुलाबाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये टाकून बारीक कराव्या लागतील. आता त्यातच कोरफडीचा गर टाकून व्यवस्थित मिसळा. ते मिश्रण एका भांड्यात काढा. त्यात मुलतानी माती, मध घालून पेस्टसारखे करा. ही मऊ पेस्ट चेहऱ्याला लावा.
हा फेसपॅक चेहऱ्याला लावण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करायला विसरू नका. त्यानंतर ही पेस्ट लावा आणि हाताने हलक्या हाताने मसाज करा. चेहऱ्यावर पातळ थर लावा. तो पूर्णपणे वाळल्यानंतर टिश्यू पेपर ओला करून चेहरा स्वच्छ पुसा. हा फेसपॅक चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकतो. लगेच चमकणारी त्वचा देतो. चेहऱ्यावरील टॅनिंगही बरेचसे जाते.
तुमच्या घरी गुलाबाची फुले नसतील तर ऑनलाइन गुलाबाच्या पाकळ्यांची पावडरही मिळते. तीही तुम्ही फेसपॅकसाठी वापरू शकता. गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर खरेदी करताना ती कोणत्याही प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय बनवलेली आहे का ते पाहून घेणे उत्तम. कोरफडीच्या गरात गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर, दोन्ही घरी ठेवल्यास कधीही हा फेसपॅक चेहऱ्याला लावण्याची संधी मिळेल.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)