
AI Blouse Design : आजकाल AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा जमाना आहे. ChatGPT, Google Gemini सारखे अनेक अॅप्स आले आहेत, ज्याद्वारे तुम्ही अनेक गोष्टी शिकू शकता आणि काही तरी क्रिएटिव्ह करू शकता. फॅशन इंडस्ट्रीमध्येही AI मुळे मोठी क्रांती झाली आहे. कारण फक्त एका प्रॉम्प्टवर ते तुम्हाला एकापेक्षा एक भारी डिझाईन देतात. जर तुम्हाला शिलाई-कटाई येत असेल, तर युनिक डिझाईन्ससाठी AI ची मदत घेऊ शकता किंवा अशा डिझाईन्स टेलरला दाखवून ब्लाऊज शिवून घेऊ शकता. येथे आम्ही तुम्हाला Google Gemini द्वारे युनिक ब्लाउज डिझाईन्स मिळवण्यासाठी प्रोसेस सांगणार आहोत.
यासोबतच तुम्हाला एलिगेंट, मिनिमल, फ्युजन किंवा रॉयल ब्लाउज हवे आहे हेही सांगा. हे शब्द आउटफिटमध्ये आणखी रंगत आणतात.
चांगले रिझल्ट मिळवण्यासाठी नेहमी लिहा : no watermark, no text, realistic design
डिझाईन वेगवेगळ्या अँगलने तयार करा (फ्रंट, बॅक, साईड)
डिझाईन मिळाल्यावर त्याचा फ्लॅट स्केच किंवा कलर व्हेरिएंट बनवा.
शिलाईवाल्यांना दाखवताना फोटोसोबत फॅब्रिकचे नाव आणि रंगही सांगा.
Aspect ratio: -ar 3:4 (फुल-शॉट), -ar 4:5 (पोर्ट्रेट)- टूलनुसार सेट करा.
Resolution: उच्च रिझोल्यूशनसाठी HD किंवा 1024x1536 अशी सेटिंग द्या.
Seed & Variations: एक seed निश्चित करा जेणेकरून रिप्रोडक्शन सोपे होईल, variations तयार केल्याने छोटे बदल मिळतात.
(टीप : स्पष्ट आणि छोट्या पॉइंट्समध्ये प्रॉम्प्ट लिहाल तर आउटपुट लवकर आणि चांगले मिळेल. AI च्या फ्री व्हर्जनमधूनही तुम्ही या प्रॉम्प्टच्या मदतीने ब्लाउज डिझाईन्स बनवू शकता.)