वास्तू टिप्स: तुम्ही कितीही कमवलं तरी हातात पैसा टिकत नाहीये का? प्रत्येक कामात अडथळे येत आहेत? मग कोणतीही पूजा किंवा होम-हवन न करता, अवघ्या १ महिन्यात तुमचं नशीब बदलणारी ही सोपी वास्तू ट्रिक नक्की वापरून पाहा.
तुम्ही कितीही कष्ट केले तरी पैसा टिकत नसेल आणि कामात अडथळे येत असतील, तर घरातील 'नकारात्मक ऊर्जा' याला कारणीभूत असते. महागड्या पूजा करण्यापेक्षा घरातील छोट्या चुका सुधारल्या, तर एका महिन्यात तुमचे कष्ट दूर होतील. भारतीय घरांमध्ये जुन्या, निरुपयोगी वस्तू साठवून ठेवण्याची सवय असते. फरशी पुसण्यासाठी फाटके कपडे, डाय लावण्यासाठी जुना टूथब्रश आणि कधीतरी उपयोगी पडतील म्हणून साठवलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या घरात तशाच पडून असतात.
24
निरुपयोगी वस्तू बाहेर काढल्यास 'केतू' होतो सक्रिय
वास्तू शास्त्रानुसार, तुम्ही जेव्हा निरुपयोगी जुन्या वस्तू घराबाहेर काढता, तेव्हा ज्योतिषशास्त्रानुसार 'केतू' ग्रह सक्रिय होतो. केतू म्हणजे 'त्याग किंवा विरक्ती'. तुम्ही जेव्हा अनावश्यक वस्तूंचा मोह सोडून त्या बाहेर फेकता, तेव्हा तुमच्या आयुष्यात नवीन आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
34
या ५ वस्तू आजच घराबाहेर फेकून द्या!
घरात बंद पडलेली किंवा खराब झालेली घड्याळे अजिबात ठेवू नका. तुटलेले चष्मे आणि तडे गेलेल्या काचेच्या वस्तू लगेच बाहेर काढा. न वापरलेल्या जुन्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या फेकून द्या. तसेच, वर्षानुवर्षे हात न लावलेले जुने फाटके कपडे आणि बूट-चपला घरातून आजच बाहेर काढा.
तुम्ही घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करता, तेव्हा मनावरचा ताण आपोआप कमी होतो. महिन्याभरापासून रखडलेली कामे कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होतात. पैशांचा ओघ सुरळीत होतो आणि व्यापार किंवा शेअर बाजारात गुंतवलेला पैसा नफा देऊ लागतो. घर 'डिक्लटर' (अनावश्यक वस्तूंमुक्त) करणे हे एका दिवसाचे काम नसून ती एक जीवनशैली आहे. घरातील सर्वांनी मिळून निरुपयोगी वस्तू टाकून दिल्या, तर तुमचे घर कायम सकारात्मक ऊर्जा खेचून घेणारे मंदिर बनेल.