Tips for Business Growth : व्यवसायात यश मिळण्यासाठी शनिवारी करा हे उपाय, सुधारेल आर्थिक स्थिती

Published : Jun 20, 2026, 02:00 PM IST
Tips fir Business

सार

Tips for Business Growth : तुम्ही व्यवसायात फायद्याऐवजी सध्या अधिक तोट्यात आहात? तर शनिवारच्या दिवशी काही खास उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला व्यवसायात यश मिळू शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

Tips for Business Growth : तुम्हाला व्यवसायात सातत्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागतेय का? यामागे अनेक कारणे असू शकतात. पण व्यवसायाच्या ठिकाणी असणारी नकारात्मक उर्जा आणि शनि दोषामुळेही तुमच्या व्यवसायाला यश मिळणे कठीण होऊ शकते. एखाद्या ठिकाणी अधिक नाकारात्मक उर्जा असल्यास तुम्ही काही उपाय केले पाहिजेत.

ज्योतिष शास्रानुसार, व्यवसायात वाढ केवळ पैसे येणे ऐवढ्यापूर्तीच मर्यादित नसते. तर तुम्ही केलेले कर्म, समाजात मिळवलेली प्रतिष्ठा अशा काही गोष्टींवरही अवलंबून असते. तर जाणून घेऊया व्यवसायात यश मिळण्यासाठी शनिवारी कोणते उपाय करावेत याबद्दल सविस्तर...

पिंपळाच्या झाडाची पूजा

व्यवसायात तुम्हाल सातत्याने अडथळे येत असल्यास तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकता. ज्योतिषशास्रामध्ये, पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे खास महत्व सांगितले आहे. यामुळे पिंपळाच्या झाडाखाली राईच्या तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता. यामुळे व्यवसायात प्रगती होण्यास मदत होऊ शकते.

अनावश्यक खर्च टाळण्यासाठी

शनिवारच्या दिवशी एक शमीचे पान घ्या. हे पान तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी असलेल्या तिजोरीत ठेवा. ज्योतिषशास्रानुसार, शमीला संरक्षण आणि विजयाचे प्रतीक मानले गेले आहे. हा उपाय केल्याने अनावश्यक खर्च कमी होतो. तसेच तुमच्या धनामध्ये वाढ होण्यास मदत होते.

कमाई आणि व्यवसाय वाढीसाठी उपाय

हिंदू धर्मात गरजूंना अन्नदान करणे अत्यंत शुभ मानण्यात आले आहे. शनि श्रम, सेवा आणि कर्मयोगाचा कारक मानला जातो. अशातच तुम्ही तुम्हाला शक्य होईल तेवढे गजूंना अन्नदान करू शकता. या उपायामुळे व्यापार वृद्धी होण्यास मदत होते.

नकारात्मकता दूर करण्यासाठी उपाय

शनिवारी व्यवसायाच्या मुख्य दरवाज्यावर काळे तीळ ठेवा. काळ्या तिळाचा शनिसोबक संबंध असल्याचे ज्योतिषशास्रात सांगण्यात आले आहे. यामुळे व्यवसायाच्या ठिकाणी असणारी नकारात्मक उर्जा दूर होण्यास मदत होईल. सकारात्मक उर्जा वास करेल.

व्यवहारासंबंधित उपाय

काही वेळेस शनि दोषामुळे व्यापारात नुकसान सहन करावे लागते. या समस्येपासून दूर राहण्यासाठी काळ्या कुत्र्याला शनिवारी तूपाची पोळी खाण्यास द्या. यामुळे शनि दोष दूर होण्यास मदत होईल.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Navratri 2026 Fashion: जुन्या कपड्यांना द्या नवा लूक, नवरात्रीसाठी ९ भन्नाट आयडिया!
Navratri 2026 Outfits : जान्हवी ते आलिया, नवरात्रीसाठी 9 बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स