Bhaubeej 2023 Kadhi Ahe: दिवाळीत भाऊ-बहिणीच्या नात्याचा साजरा होणार सण म्हणजे दिवाळी. पण यंदा भाऊबीज सण नेमका कोणत्या दिवशी साजरा करावा, याबाबत लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे दिसत आहे. जाणून घेऊया योग्य तिथिबद्दलची माहिती…
Bhaubeej 2023 Date And Muhurat : धार्मिक ग्रंथांनुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज सण (Diwali 2023 Bhaubeej) साजरा केला जातो. हा सण म्हणजे भाऊ-बहिणीमधील निस्वार्थी-अतूट नात्याचे प्रेमाचे प्रतीक. देशातील वेगगेळ्या ठिकाणी हा उत्सव वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. उदाहरणार्थ भाई दूज, भाई टिका, यम द्वितीया इत्यादी.
Bhaubeej 2023 Date :
पण यंदा भाऊबीज सण नेमका कोणत्या दिवशी साजरा करावा, यावरून लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे दिसत आहे. भाऊबीज सणाच्या दोन तिथि असल्याने हा गोंधळ निर्माण झाला आहे. पण चिंता करू नका. या लेखाद्वारे आपण भाऊबीज सणाची (Bhai Dooj 2023) योग्य तिथि, शुभ मुहूर्त, विधि इत्यादी संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊया...
भाऊबीज 2023 कधी आहे? (Kadhi Ahe Bhaubeej 2023)
पंचांगानुसार, यंदा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची द्वितिया तिथि 14 नोव्हेंबर रोजी (मंगळवार) दुपारी 02 वाजून 36 मिनिटांनी सुरू होणार असून ते दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 नोव्हेंबर रोजी (बुधवार) दुपारी 01 वाजून 47 मिनिटांपर्यंत असेल. द्वितिया तिथिचा सूर्योदय 15 नोव्हेंबर रोजी होणार असल्याने या दिवशी भाऊबीज सण साजरा केला जाणार आहे.
भाऊबीज 2023 सणाचा शुभ मुहूर्त (Bhaubeej 2023 Shubh Muhurat)
भाऊबीज सणाच्या दिवशी बहीण आपल्या भावांचे औक्षण करते. भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. लाडक्या भाऊरायासाठी पंचपक्वान्नही करते. यंदा भाऊबीज सण साजरा करण्यासाठी शुभ मुहूर्त संध्याकाळी 07 वाजून 16 मिनिटांपासून ते रात्री 08 वाजून 55 मिनिटांपर्यंत आहे.
भाऊबीज सणाची पूजा विधि (Bhaubeej 2023 Puja Vidhi)
भाऊबीज सण का साजरा केला जातो? जाणून घ्या कथा (Bhaubeej Katha)
ग्रंथांनुसार, एकदा यमराज कार्तिक शुक्ल द्वितिया तिथिला आपली बहीण यमुनेला भेटण्यासाठी पृथ्वीवर आले होते. यावेळेस यमुनेने आपल्या भावाला भोजन दिले आणि टिळक लावून त्यांचा आदर-सत्कार केला. बहिणीचे इतके प्रेम पाहून यमराज म्हणाले की, 'कार्तिक शुक्ल द्वितिया तिथिला जो कोणी आपल्या बहिणीच्या घरी भोजन करेल त्याचा अकाली मृत्यू होणार नाही.' तेव्हापासून भाऊबीज सण साजरा करण्याची परंपरा चालत आली आहे.
आणखी वाचा
Diwali 2023 Puja Samagri : दिवाळीच्या पूजेचं साहित्य आजच आणा घरी, विसरू नका एकही वस्तू
Diwali 2023 : सावधान! या 8 चुका केल्या तर लक्ष्मी माता होईल नाराज
दिवाळीत लक्ष्मी माता, सरस्वती व श्री गणेशाची पूजा का करतात?
DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.