दिवाळी सणात महालक्ष्मी माता, सरस्वती व श्री गणेशाचे पूजन का करतात? काय आहे शास्त्र
Lifestyle Nov 09 2023
Author: Harshada Shirsekar Image Credits:Getty
Marathi
दीपावली 2023
दिवाळीचा सण 12 नोव्हेंबरला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी लक्ष्मीमातेसह सरस्वती व श्रीगणेशाचेही पूजन केले जाते.
Image credits: Getty
Marathi
का केली जाते पूजा?
दिवाळीत या तिन्ही देवतांची पूजा का केली जाते. जाणून घेऊया या मागील कारण...
Image credits: Getty
Marathi
देवी लक्ष्मीची पूजा का करतात?
धार्मिक ग्रंथांनुसार समुद्र मंथनादरम्यान देवी लक्ष्मी प्रकट झाली होती, त्यावेळेस आश्विन महिन्याची अमावस्या तिथि होती. यामुळे दरवर्षी दिवाळीत लक्ष्मी देवीची पूजा केली जाते.
Image credits: Getty
Marathi
देवी सरस्वती पूजा का केली जाते?
जेव्हा अचानक धनप्राप्ती होते, त्यावेळेस मनात चुकीची कामे करण्याचे विचार येऊ लागतात. तेव्हा देवी सरस्वती आपल्याला चांगल्या-वाईट गोष्टींचे ज्ञान देऊन चुकीचे काम करण्यापासून रोखते.
Image credits: Getty
Marathi
श्रीगणेशाचे पूजन
गणपती ही बुद्धीची देवता आहे. जेव्हा आपल्याकडे पैसा येतो, त्यावेळेस धन जतन करण्याची बुद्धी असणे गरजेचं आहे. संपत्ती जतन करण्याची बुद्धी श्रीगणेश आपल्याला देतात.
Image credits: Getty
Marathi
देवी लक्ष्मी, सरस्वती व श्रीगणेशाचे पूजन
याच कारणामुळे दिवाळीत महालक्ष्मी-सरस्वती मातेसह गणपती बाप्पाचीही पूजा केली जाते.
Image credits: Getty
Marathi
परंपरा
दिवाळीत देवी लक्ष्मीसह सरस्वती व श्रीगणेशाची पूजा केल्यास मनात चांगल्या भावना निर्माण होतात. याच भावना चुकीच्या-अयोग्य गोष्टींना बळी पडण्यापासून आपला बचाव करतात.
Image credits: Getty
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.