Relationship Advice : नातेसंबंध टिकवताना विश्वास महत्त्वाचा असतो, पण प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगणे योग्यच असेल असे नाही. काही वैयक्तिक गोष्टी, भविष्यातील योजना किंवा आर्थिक माहिती अति शेअर केल्यास त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.
आजच्या सोशल मीडियाच्या काळात अनेक जण आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मित्र, नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांसोबत शेअर करतात. मात्र प्रत्येक व्यक्ती तुमच्या आनंदात किंवा यशात मनापासून सहभागी असेलच असे नाही. काहीवेळेस तुम्ही सर्वच गोष्टी समोरच्या व्यक्तीला सांगितल्यास त्यामधून तुमच्याबद्दल गैरसमज, मत्सर किंवा अनावश्यक हस्तक्षेप निर्माण होऊ शकतो. त्यामुळे काही गोष्टी स्वतःपुरत्याच ठेवणे हे मानसिक शांतता आणि नातेसंबंधासाठी फायद्याचे ठरू शकते.
25
भविष्यातील योजना आधीच जाहीर करणे टाळा
नवीन व्यवसाय, नोकरीतील बदल, नवं घर खरेदी किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण होण्यापूर्वी सर्वांना सांगण्याची घाई करू नका. काहीवेळा गोष्टींना यश मिळण्यासाठी टीका, नकारात्मक प्रतिक्रिया किंवा अनावश्यक दबाव निर्माण केला जाऊ शकतो. काम पूर्ण झाल्यानंतर त्याची माहिती देणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
35
स्वतःच्या उणीवा सांगू नका
प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही गोष्टींची उणीव असते. यामुळे प्रत्येकासमोर आपल्या उणीवा व्यक्त करणे योग्य नाही. चुकीच्या व्यक्तीला याबद्दल कळल्यास तो तुमचा गैरफायदा घेऊ शकतो. यामुळे भावनिक मर्यादा राखण्यासह स्वतःच्या काही गोष्टींसाठी गुप्तता बाळगणे आवश्यक आहे. जपून ठेवणे हे दीर्घकालीन दृष्टीने फायद्याचे ठरते.
पती-पत्नी किंवा प्रेमसंबंधातील प्रत्येक वाद, मतभेद किंवा खासगी संवाद मित्रमंडळींना सांगणे योग्य नाही. क्षणिक रागातून सांगितलेल्या गोष्टी नंतर नात्यावर दीर्घकाळ परिणाम करू शकतात. नात्यातील समस्या सोडवण्यासाठी कपलने एकमेकांसोबत संवाद साधणे बेस्ट पर्याय आहे. यामध्ये तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप तुमच्या नात्यातील काही गोष्टी बिघडण्यास कारणीभूत ठरू शकतो.
55
आर्थिक माहितीची गुप्तता ठेवा
तुमचा पगार, बचत, गुंतवणूक किंवा आर्थिक स्थिती याबद्दल प्रत्येकाला माहिती देणे टाळा. आर्थिक माहिती चुकीच्या व्यक्तींपर्यंत पोहोचल्यास त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. काही लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतात, तर काही वेळा अनावश्यक अपेक्षा तुमच्याकडून ठेवू शकतात. यामुळे आर्थिक व्यवहाराची गोष्ट स्वत:ची असल्याने ती फक्त विश्वासू व्यक्तींपुरतीच मर्यादित ठेवा.