Dal Paratha Recipe : रात्रीच्या शिळ्या डाळीपासून नाश्तासाठी तयार करा चविष्ट पराठा, वाचा संपूर्ण रेसिपीसह खास टिप्स

Published : Jun 16, 2026, 11:05 AM IST

Dal Paratha Recipe : रात्रीची उरलेली डाळ अनेकदा दुसऱ्या दिवशी फेकून दिली जाते. मात्र याच डाळीपासून सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक, चविष्ट आणि मऊ पराठे तयार करता येतात.

PREV
14
उरलेल्या डाळीपासून हेल्दी नाश्ता

घरात रात्री बनवलेली डाळ अनेकदा उरते आणि दुसऱ्या दिवशी तिचं काय करावं हा प्रश्न पडतो. काही जण ती पुन्हा गरम करून खातात, तर काही वेळा फेकून दिली जाते. मात्र थोडी आयडिया वापरली तर या डाळीपासून सकाळचा हेल्दी नाश्ता तयार करू शकतो. शिळ्या डाळीपासून तयार केलेला पराठा हा चवदार, पौष्टिक आणि पोटभर नाश्त्याचा उत्तम पर्याय आहे. जाणून घेऊया शिळ्या डाळीपासून पराठा कसा तयार करायचा याच्या रेसिपीसह काही खास टिप्स…

24
पराठा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
  • उरलेली तूर डाळ, मूग डाळ किंवा मिश्र डाळ
  • एका वाटी डाळीसोबत दोन कप गव्हाचे पीठ
  •  बारीक चिरलेली कोथिंबीर
  • २-३ हिरवी मिरची
  • पाव चमचा जिरे
  • पाव चमचा ओवा
  • अर्धा चमचा लाल तिखट
  • पाव चमचा हळद 
  • चवीनुसार मीठ घ्यावे. 
  • डाळ पातळ असल्यास थोडे अधिक पीठ घालावे. सर्व साहित्य एकत्र करून मऊसर पीठ मळून घ्यावे. डाळीमुळे पिठाला वेगळी चव आणि मऊपणा मिळतो.
34
पराठा बनवण्याची सोपी पद्धत

मळलेले पीठ दहा मिनिटे झाकून ठेवावे. त्यानंतर त्याचे मध्यम आकाराचे गोळे करून पराठे लाटावेत. तवा गरम करून त्यावर पराठा दोन्ही बाजूंनी भाजावा. वरून थोडे तूप किंवा तेल लावल्यास पराठा अधिक खमंग लागतो. दही, लोणचे, चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर हा पराठा सर्व्ह करता येतो. सकाळच्या घाईत झटपट तयार होणारा हा नाश्ता दिवसभरासाठी ऊर्जा देतो.

44
पराठा अधिक चविष्ट बनवण्यासाठी खास टिप्स

पराठा अधिक चविष्ठ होण्यासाठी पिठात किसलेले गाजर, बारीक चिरलेला कांदा किंवा कसूरी मेथी मिक्स करू शकता. डाळीमध्ये आधीच मसाले असतील तर अतिरिक्त मसाले कमी प्रमाणात वापरावेत. पीठ खूप घट्ट किंवा खूप पातळ होणार नाही याची काळजी घ्यावी. पराठे गॅसवर मंद आचेवर भाजल्यास ते आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत होतात.

Read more Photos on

Recommended Stories