Travelling Tips: तिशीच्या आत सोलो ट्रिप करणं म्हणजे फक्त फिरणं नाही, तर स्वतःला शोधण्याचा आणि अधिक मजबूत बनण्याचा एक मार्ग आहे. वयाची 30 वर्षे पूर्ण होण्याआधी सोलो ट्रिप का करावी, याची कारणं जाणून घेऊया.
प्रवासाला जायला कोणाला आवडत नाही? पण अनेकजण म्हणतात, 'अजून वय आहे, लग्न झाल्यावर किंवा तिशीनंतर फिरेन'. घरातले आणि मित्रमंडळीही 'आता सेटल हो, एकट्याने कुठे फिरतोस' असं म्हणतात. पण आम्ही सांगतो, तिशीची वाट बघू नका. उलट, तिशीच्या आतच एकदा सोलो ट्रिप नक्की करा. का? त्याची कारणं पुढे आहेत.
26
सोलो ट्रिप करण्याची 5 कारणं
रोजची धावपळ, ऑफिसचं टेन्शन आणि मित्र-कुटुंबीयांच्या अपेक्षांमध्ये आपण स्वतःला काय हवंय हेच विसरून जातो. सोलो ट्रिपवर असताना तुम्हाला कोणी जज करणारं नसतं. कधी उठावं, काय खावं आणि कुठे जावं, हे निर्णय पूर्णपणे तुमचे असतात. हा एकटेपणा तुम्हाला स्वतःशी जोडतो आणि तुमचा आत्मविश्वास वाढवतो.
36
बजेट मॅनेजमेंट
सोलो ट्रिपमध्ये तुम्हीच तुमचे 'अर्थमंत्री' असता. कमी बजेटमध्ये प्रवास कसा करायचा, हॉटेल बुकिंग आणि अचानक येणाऱ्या अडचणी कशा हाताळायच्या, हे तुम्ही स्वतः शिकता. हा अनुभव तुम्हाला आयुष्यातील मोठी आव्हानं कशी पेलायची हे शिकवतो.
ग्रुपसोबत फिरताना आपण आपल्याच मित्र-मैत्रिणींमध्ये व्यस्त असतो. पण जेव्हा तुम्ही एकटे असता, तेव्हा तुम्हाला अनोळखी लोकांशी बोलायची संधी मिळते. हॉस्टेलमध्ये राहणं, स्थानिक लोकांसोबत चहा पिणं आणि त्यांच्या गोष्टी ऐकणं, यातून तुम्ही एक चांगली व्यक्ती म्हणून घडता.
56
जबाबदाऱ्या
तिशीनंतर आयुष्यात जबाबदाऱ्या खूप वाढतात. काहींचं लग्न होतं, तर काहीजण कर्जाच्या ओझ्याखाली असतात. अनेकजण करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असतात. अशा परिस्थितीत, फक्त एक बॅग उचलून प्रवासाला निघणं तितकं सोपं राहत नाही.
66
कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे
सोलो ट्रिप तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायला भाग पाडते. अनोळखी शहर, नवीन भाषा आणि वेगळं जेवण सुरुवातीला भीतीदायक वाटू शकतं. पण एकदा का तुम्ही या आव्हानांवर मात केली, की तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक कणखर आणि निर्भीड बनता.