Kitchen Hacks : कैरी-पुदिन्याची चटणी तयार केल्यानंतर काळी पडते? ट्राय करा ही ट्रिक
उन्हाळ्याच्या दिवसात कैरी आणि पुदीन्याची चटणीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पण बहुतांशवेळा चटणी तयार केल्यानंतर काळी पडते. यावर उपाय काय याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
Kitchen Hacks : उन्हाळ्याच्या दिवसात वरण भात अथवा चपातीसोबत कैरी-पुदिन्याची चटणी बेस्ट फूड कॉम्बिनेशन मानले जाते. पण बहुतांश महिलांना असा प्रश्न पडतो की, कैरी-पुदिन्याची चटणी तयार केल्यानंतर काही वेळाने काळी पडते. अशातच यावर उपाय काय असू शकतो याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...
कैरी-पुदीना चटणी तयार करण्यासाठी सामग्री
एक कैरी
एक कप पुदीन्याची पाने
दीड कप कोथिंबीर
1-2 हिरवी मिरची
एक चमचा जीरे
दीड चमचा लिंबूचा रस
चवीनुसार मीठ
एक लहान तुकडा आलं
आवश्यकतेनुसार पाणी
अशी तयार करा चटणी
सर्वप्रथम कैरीची साल काढून त्याचे लहान-लहान तुकडे कापून घ्या.
पुदिना आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या.
हिरवी मिरची आणि आलं मोठ्या आकारात कापून घ्या
मिक्सरच्या भांड्यात कैरीचे तुकडे, आलं, कोथिंबीर, पुदीना, हिरव्या मिरची, जीरे आणि एक चिमुटभर मीठा टाकून सर्व सामग्री वाटून घ्या.
कैरी-पुदीन्याची चटणी काळी पडण्यापासून दूर राहण्यासाठी यामध्ये चार बर्फाचे तुकडे आणि अर्धा चमचा लिंबूचा रस मिक्स करा. असे केल्याने चटणीचा रंग गडद हिरवा होईल.
सर्व सामग्री व्यवस्थित मिक्सरमध्ये व्यवस्थितीत वाटून घेतल्यानंतर यामध्ये पुन्हा लिंबाचा रस आणि साखर मिक्स करा.
चटणी टेस्ट करुन पाहा आणि चवीनुसार मीठ, साखर आणि लिंबाचा रसही पुन्हा मिक्स करा.
चटणी एका डब्यात भरुन ठेवून 10 दिवसपर्यंत वापरु शकता.