या दिवशी बुध मार्गी होऊन कर्क राशीतील सूर्याशी युती करतील. शनि वक्री असतील आणि गुरु-शुक्र मीन राशीत मिळून अत्यंत शुभ योग देतील. याशिवाय भरणी, कृतिका आणि रोहिणी नक्षत्र एकत्र येतील. तसेच १६ ऑगस्ट २०२५ रोजी वृद्धि योग, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि ज्वालामुखी योग असा महासंयोग होईल.