केसांच्या वाढीसाठी बेस्ट आहेत हे 5 तेल, आठड्याभरात दिसेल फरक
Lifestyle Jan 17 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:SOCIAL MEDIA
Marathi
नारळाचे तेल
नारळाच्या तेलामुळे केसांना नैसर्गिक ओलसरपणा मिळतो. याशिवाय केस मजबूत होतात. नारळाचे तेल केसांना लावल्याने केस मजबूत, जाड होण्यासह तुटण्याच समस्या कमी होते.
Image credits: Facebook
Marathi
ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइल केसांना लावल्याने केस गळती, केसांना फाटे फुटणे अशा समस्या दूर होतात. याशिवाय केस घनदाट आणि मजबूत होण्यास मदत होते.
Image credits: Getty
Marathi
बदामाचे तेल
केसांसाठी बदामाचे तेल फायदेशीर मानले जाते. यामुळे केसांना चमक येण्यासह सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव होतो.
Image credits: Social Media
Marathi
असा करा वापर
बदामाचे तेल केसांच्या मूळांना लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे केसांची मूळ मजबूत होतील. याशिवाय केस तुटण्याची समस्याही कमी होईल.
Image credits: freepik
Marathi
कढीपत्त्याचे तेल
कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते. याचे तेल केसांना लावल्याने केस मजबूत आणि चमकदार होतात. नारळ किंवा राईच्या तेलात मिक्स करुन कढीपत्त्याचे तेल लावू शकता.
Image credits: Freepik
Marathi
असे लावा तेल
कढीपत्त्याचे तेल हलके गरम करुन घ्या. आठवड्यातून दोनदा केसांच्या मूळांना कढीपत्त्याच्या तेलाने मसाज करा. यामुळे घनदाट केस येण्यास मदत होईल.
Image credits: unsplash
Marathi
एरंडीचे तेल
एरंडीच्या तेलाचा वापर केल्याने केसांची वेगाने वाढ होते. या तेलाने केसांच्या मूळांना मसाज केल्यास पातळ केसांची समस्या दूर होते.
Image credits: Social media
Marathi
असा करा वापर
एरंडीचे तेल केसांची वाढ होण्यास फायदेशीर मानले जाते. आठवड्यातून एकदा केसांना एरंडीचे तेल लावू शकता.
Image credits: unsplash
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.