VIRAL VIDEO : पोलीस अधिकाऱ्याने गायलं अ‍ॅनिमल सिनेमाचे गाणे, सुरेल आवाज ऐकून लोक म्हणाले - ‘तुम्ही बॉलिवूडमध्ये असायला हवे’

Published : Dec 29, 2023, 11:39 AM ISTUpdated : Dec 29, 2023, 11:46 AM IST
police-man-singing-animal-famous-song-pahle-bhi-main

सार

Animal Movie Song : अ‍ॅनिमल सिनेमाच्या गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानंही या सिनेमातील गाणे गायले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Animal Movie Song : सोशल मीडिया हे एक असे व्यासपीठ आहे, जेथे प्रत्येकजण स्वतःमधील कौशल्य थेट संपूर्ण जगाला दाखवू शकतो. तुमचे क्षेत्र कोणतेही असो, पण टॅलेंट खरं असेल तर तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होणारच. 

शिवाय रातोरात तुम्ही स्टारही होऊ शकता. सोशल मीडियावर सध्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या व्हिडीओची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. पोलीस अधिकारी आपले कर्तव्य बजावण्यासोबतच गाणे गात असल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

त्यांचा आवाज अतिशय सुरेल व मंत्रमुग्ध करणारा आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या अ‍ॅनिमल सिनेमातील गाणे ते गात आहेत, पण हे गाणे त्यांनी स्वतःच्या पद्धतीने गायले आहे.

पोलीस अधिकाऱ्याने गायलं गाणे

इंस्टाग्रामवर ‘rajat.rathor.rj’ या नावाने असणाऱ्या पेजवर पोलीस अधिकाऱ्याने आपला व्हिडीओ शेअर केला आहे. गाडीमध्ये बसून ते रणबीर कपूर व रश्मिका मंदानाचा ब्लॉकबस्टर सिनेमा अ‍ॅनिमलचे गाणं गात आहेत. अमित मिश्राने गायलेले ‘पहले भी मैं तुमसे मिला हूं’ हे गाणे त्यांनी आपल्या पद्धतीने गायले आहे. या पोलीस अधिकाऱ्यानं गायलेले हे गाणे आपण ऐकले तर तुम्ही देखील हेच म्हणाल की, तुम्ही तर बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावून पाहायला हवे.

अरिजीत सिंहचेही गायले गाणे

इतकंच नव्हे तर या पोलीस अधिकाऱ्याने अ‍ॅनिमल सिनेमातील ‘सतरंगा’ गाणे देखील गायले आहे. अरिजीत सिंहने अतिशय सुंदर पद्धतीने हे गाणे गायले आहे. तितक्याच सुरेल आवाजात या पोलीस अधिकाऱ्यानंही ‘बदरंग में सतरंगा है यह इश्क रे’ हे गाणं गायलंय.

सोशल मीडियावर या पोलीस अधिकाऱ्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एका युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की, हा आवाज मी अनेकदा ऐकू शकते. तर आणखी एका युजरने म्हटलंय की, मूळ गाण्यापेक्षाही हे गाणे सुंदर आहे. मजेशीर कमेंट करत एका युजरने लिहिले की, पोलीस गाणे गाण्यात व्यस्त असल्याने अ‍ॅनिमल चित्रपटात पोलीस दाखवले गेले नाहीत.

आणखी वाचा :

गाजर हलव्यामध्ये दूध मिक्स करताना करू नका ही चूक, अन्यथा बिघडेल चव

Inspirational Story : धीरूभाई अंबानींचे संपूर्ण कुटुंब 1BHK फ्लॅटमध्ये राहते होते, पगार होता केवळ 300 रुपये

Vastu Tips : मनी प्लाँट चोरणे योग्य की अयोग्य? कधीही करू नका या 5 चुका

PREV

Recommended Stories

अंबानींच्या ज्वेलरी कलेक्शनची चर्चा! २०२५ मध्ये टॉपवर असलेले नीता-ईशाचे १० सर्वाधिक महागडे आणि स्टायलिश दागिने पाहा!
फक्त ₹700 मध्ये! 'या' 1 ग्राम गोल्ड चेन डिझाईन्स पुढे खरं सोनंही फिकं पडेल!