Shani Sadesati 2024 : नववर्षात या 3 राशींसाठी सुरू होणार शनिची साडेसाती

Shani Sade Sati : नववर्षाची प्रत्येकजण वाट पाहात आहेत. येणारे नववर्ष आनंदीत-उत्साहात जावे असे प्रत्येकाला वाटते. पण 2024 वर्षात काही राशींसाठी शनिची साडेसाती सुरू होणार आहे. याबद्दलच जाणून घेऊया अधिक....

 

Chanda Mandavkar | Published : Dec 29, 2023 4:47 AM IST / Updated: Jan 06 2024, 03:54 PM IST

Shani Sadesati 2024 : हिंदू धर्मात ज्योतिष, राशी, अंकशास्र आणि पंचांग याचे फार महत्त्व आहे. बहुतांशजण आपले येणारे वर्ष कसे असेल याबद्दल ग्रह, साडेसाती अशा गोष्टींची माहिती घेत राहतात. पण तुम्हाला माहितेय का, प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदातरी शनिच्या साडेसातीला सामोरे जावे लागते.

ज्योतिषशास्रानुसार, शनिची साडेसाती ज्या राशींसाठी सुरू होते, त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागतो. नववर्षामध्ये (2024) कोणत्या राशींना शनिच्या साडेसातीचा सामना करावा लागणार आहे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

कुंभ रास
उज्जैनमधील ज्योतिषतज्ज्ञ पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार, वर्ष 2024 मध्ये शनि संपूर्ण काळ कुंभ राशीत असणार आहे. म्हणजेच नववर्षात शनि रास परिवर्तन करणार नाही. वर्षाच्या मध्यात शनि वक्री होईल.

या राशींसाठी सुरू होणार साडेसाती
वर्ष 2024 मध्ये शनिची साडेसाती मकर रास, कुंभ रास आणि मीन राशीसाठी सुरू होणार आहे. मीन राशीवर शनिच्या साडेसातीचा पहिला टप्पा, कुंभ राशीवर दुसरा आणि मकर राशीचा तिसरा टप्पा असणार आहे.

मकर रास
साडेसातीचा अंतिम टप्पा हा मकर राशीवर असणार आहे, जो तुम्हाला सामान्य फळ देईल. यादरम्यान, मकर राशीतील व्यक्तींच्या काही समस्या दूर होतील. याशिवाय शनिची कृपा रहाण्यासह आरोग्य सुधारले जाईल.

कुंभ रास
कुंभ राशीतील व्यक्तींनी संपूर्ण वर्ष सावध राहावे. धन-हानी, दुर्गघटना अशा घटनांना सामोरे जावे लागेल. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांमध्ये अडकू शकता. वारंवार वादाची स्थिती कुंभ राशीतील व्यक्तींसाठी निर्माण होऊ शकते.

मीन रास
मीन राशीतील व्यक्तींना शनिच्या साडेसातीमुळे फार मोठे नुकसान होणार आहे. या राशीतील व्यक्तींनी अधिक काम केले तरीही त्याचे श्रेय मिळणार नाही. एखाद्या दुर्घटनेची देखील शक्यता आहे.

शनिची साडेसाती म्हणजे काय?
साडेसाती म्हणजे सात वर्षांचा काळ. यामध्ये शनिचा प्रभाव आपल्या आयुष्यावर राहातो. शनिच्या साडेसातीदरम्यान आपल्याला आपण केलेल्या वाईट कर्मांची शिक्षा शनिदेव देतात.

आणखी वाचा: 

Money Horoscope 2024 : वर्ष 2024मध्ये मकर, कुंभ व मीन राशीपैकी कोणाला होईल धनलाभ? जाणून घ्या

Money Horoscope 2024 : तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांना कोणत्या क्षेत्रात मिळेल यश, नोकरी की व्यवसाय?

Finance Horoscope 2024 : नववर्षात कर्क, सिंह, कन्या राशीपैकी कोण होईल शेअर मार्केटमुळे मालामाल?

Share this article