Parenting Tips : मुलांवर प्रेम करुनही कधीकधी त्यांना एकटे का वाटते? वाचा ५ कारणे

Published : Dec 19, 2025, 02:15 PM IST

Parenting Tips : पालकांचे प्रेम असूनही वेळेचा अभाव, संवाद कमी असणे, अती अपेक्षा, भावना व्यक्त न करता येणे आणि डिजिटल दुरावा यामुळे मुलांना एकटेपणाची भावना जाणवू शकते. 

PREV
16
प्रेम असूनही मनात दरी का निर्माण होते?

बहुतेक पालक आपल्या मुलांवर मनापासून प्रेम करतात, त्यांची काळजी घेतात आणि त्यांना उत्तम आयुष्य द्यायचा प्रयत्न करतात. तरीसुद्धा अनेक मुलांना आतून एकटेपणाची भावना सतावत असते. ही भावना केवळ दुर्लक्षामुळेच निर्माण होते असे नाही, तर कधी कधी अती अपेक्षा, संवादाचा अभाव किंवा भावनिक समज कमी असल्यामुळेही मुलांना एकटे वाटू शकते. मुलांचे भावविश्व समजून न घेतल्यास ही समस्या हळूहळू वाढत जाते आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

26
वेळ कमी, लक्ष कमी

आजच्या धावपळीच्या जीवनात पालक मुलांसाठी सर्व काही करतात, पण ‘वेळ’ देऊ शकत नाहीत. मोबाईल, कामाचा ताण, ऑफिस आणि जबाबदाऱ्या यामुळे मुलांसोबत मनापासून संवाद साधायला वेळ मिळत नाही. अशावेळी मुलांना असे वाटते की त्यांच्यासोबत कोणीच नाही, कोणी त्यांचे ऐकून घेणारे नाही. फक्त एकत्र राहणे नव्हे, तर दर्जेदार वेळ देणे हे मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते.

36
भावना व्यक्त करण्याची संधी न मिळणे

अनेक वेळा पालक मुलांना काय करावे, काय करू नये हे सांगतात; पण त्यांना काय वाटते, काय त्रास देत आहे हे विचारत नाहीत. राग, भीती, दुःख किंवा अपयश यांसारख्या भावना व्यक्त करण्याची संधी न मिळाल्यास मुलं मनातल्या मनात गुदमरतात. भावना दाबल्या गेल्याने त्यांना एकटेपणा जाणवू लागतो आणि आत्मविश्वासही कमी होतो.

46
अती अपेक्षा आणि सतत तुलना

“अमुक इतके गुण मिळाले पाहिजेत”, “तो/ती बघ किती हुशार आहे” अशी तुलना सतत केली गेल्यास मुलांवर मानसिक दडपण येते. पालकांचे प्रेम अटीवर आहे, असे मुलांना वाटू लागते. आपण जसे आहोत तसे स्वीकारले जात नाही, ही भावना एकटेपणाला खतपाणी घालते. मुलांना समजून घेतले जाण्याची आणि स्वीकारले जाण्याची गरज असते.

56
ऐकून न घेण्याची सवय

मुलं काही सांगत असताना पालकांनी मध्येच उपदेश देणे, त्यांना थांबवणे किंवा त्यांच्या समस्येला किरकोळ समजणे, यामुळे संवाद तुटतो. “तू लहान आहेस, तुला काय कळतं?” असा दृष्टिकोन मुलांना भावनिकदृष्ट्या एकटे करतो. आपली बाजू ऐकून घेतली जात नाही, असे वाटल्यास मुलं स्वतःला अलग ठेवायला लागतात.

66
डिजिटल अंतर आणि भावनिक दुरावा

आज मुलं आणि पालक दोघेही मोबाईल, टीव्ही, सोशल मीडियामध्ये गुंतलेले असतात. प्रत्यक्ष संवाद कमी झाल्याने भावनिक नात्यात अंतर निर्माण होते. घरात असूनही मुलांना एकटे असल्यासारखे वाटते. डिजिटल साधनांपेक्षा प्रत्यक्ष संवाद आणि स्पर्श, कौतुक, आधार यांची मुलांना जास्त गरज असते.

Read more Photos on

Recommended Stories