चिकनच्या वेगवेगळ्या रेसिपींपैकी ऑरेंज चिकन ही एक वेगळीच रेसिपी आहे. ही चायनीज-अमेरिकन रेसिपी असून चिकनला आंबट-गोड चव देते. चला तर मग जाणून घेऊया ही रेसिपी स्टेप बाय स्टेप.
ऑरेंज चिकन रेसिपी : तुम्हाला चिकनच्या वेगवेगळ्या रेसिपी तयार करायला आवडतात का? आज आपण ऑरेंज चिकनची रेसिपी पाहणार आहोत. खरंतर ऑरेंज चिकन ही एक चीनी-अमेरिकन रेसिपी आहे. या रेसिपीमधील कुरकुरीत चिकनला आंबट-तिखट चव असते. जाणून घेऊया याची रेसिपी स्टेप बाय स्टेप....
साहित्य
अर्धा किलो बोनलेस चिकन
एक कप कॉर्नस्टार्च
एक अंड
मीठ चवीनुसार
काळी मिरी
तेल
सॉससाठी साहित्य
एक कप संत्र्याचा रस
संत्र्याची साल
एक तृतीयांश चमचा सोया सॉस
एक चतुर्थांश चमचा व्हिनेगर
एक चमचा बारीक चिरलेले आले
एक चमचा बारीक चिरलेली लसूण
एक तृतीयांश चमचा ब्राउन शुगर
एक मोठा चमचा कॉर्नस्टार्च
कांद्याची पात
तीळ
कृती
सर्वप्रथम एका भांड्यात बोनलेस चिकन घेऊन त्यावर मीठ आणि काळी मिरीची पूड टाका. आता कॉर्नस्टार्चमध्ये अंडे आणि थोडे पाणी मिसळून बॅटर तयार करून ते चिकनमध्ये मिसळा.
चिकन व्यवस्थित मॅरीनेट झाल्यानंतर गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये तेल गरम करा. आता तेलामध्ये मॅरीनेट केलेले चिकन तपकिरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. चिकन तळून झाल्यानंतर एका दुसऱ्या भांड्यात ते काढून ठेवा.
सॉस तयार करण्यासाठी, पॅन गॅसवर मंद आचेवर ठेवून त्यामध्ये संत्र्याचा रस, संत्र्याची साल, सोया सॉस, व्हिनेगर, ब्राउन शुगर, आले, लसूण मिसळा. सर्व गोष्टी उकळल्यानंतर त्यामध्ये कॉर्नस्टार्च मिसळा.
सॉस घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये तळलेले चिकन व्यवस्थित मिसळा. ऑरेंज चिकन तयार झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून त्यावर चिरलेली कांद्याची पात आणि तीळ घालून सजवा.