नखांची काळजी: सुंदर नखांसाठी ५ पौष्टिक पदार्थ खा

Published : May 06, 2025, 05:15 PM IST
नखांची काळजी: सुंदर नखांसाठी ५ पौष्टिक पदार्थ खा

सार

नखांची काळजी: हातांची नखं सुंदर दिसण्यासाठी नखांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ज्यांच्या आहारात पुरेशी पोषणतत्वे असतात त्यांची नखं चमकदार आणि सुंदर दिसतात. सुंदर नखांसाठी कसा असावा पौष्टिक आहार ते जाणून घेऊया.

नखांची काळजी: आपण त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अनेक प्रकारचे ब्युटी ट्रिटमेंट्स करतो. त्याचप्रमाणे नखांच्या सौंदर्याकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. काही महिलांची नखे छान वाढतात. पण काही वेळेस ती तुटतात किंवा कोरडी पडतात. या समस्येपासून दूर राहण्यासाठी महिला मेनिक्युअर आणि पेडिक्युअर करतात. तरीही नखं मजबूत आणि चमकदार दिसत नाहीत. 

खरंतर आपण सुदृढ राहण्यासाठी ज्याप्रकारे आरोग्यदायी आहाराचे सेवन करतो, तसेच नखांच्या सौंदर्यासाठी देखील काही जीवनसत्त्वे आणि खनिजांची गरज असते. याचबद्दल जाणून घेऊया अधिक...

व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठी आवश्यक पोषणतत्वांपैकी एक आहे. कोलेजनच्या निर्मितीसाठी 'व्हिटॅमिन सी'ची आवश्यकता असते. दात, डोळे आणि नखांसाठी कोलेजन अत्यंत फायदेशीर असते. नखांच्या सौंदर्यासाठी तुम्ही संत्रे, लिंबू, टोमॅटो आणि व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा.

बायोटिन व्हिटॅमिन
बायोटिन व्हिटॅमिनमुळे शरीरातील पेशींमध्ये वाढ होते. बायोटिन हे त्वचेसह नखांसाठी देखील फायदेशीर असते. आहारातून अ‍मिनो अ‍ॅसिडचे ग्रहण करण्यासाठी बायोटिन मदत करते. याशिवाय नखं लवकर तुटण्याची समस्याही यामुळे कमी होते. अंडी, दूध, पनीर, कोबीमधून शरीरात बायोटिनची पूर्तता होऊ शकते.

लोह
शरीरातील लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी लोहाची आवश्यकता असते. या रक्तपेशींच्या माध्यमातून संपूर्ण शरीराच्या अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यास अवयवांपर्यंत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही. यामुळे शरीरातील अवयवांसंदर्भातील समस्या उद्भवतात. त्याचप्रमाणे लोहाच्या कमतरतेमुळे नखांवर देखील परिणाम होतो.

मॅग्नेशिअम
मॅग्नेशिअममुळे नखांची उत्तम वाढ होते. पण नखांवर लांब रेषा दिसत असल्यास तर समजून जा शरीरात मॅग्नेशिअमची कमतरता आहे. यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, शेंगदाणे, काजू, बदाम यांचे सेवन करावे. 

प्रोटीन
नखांची वाढ ही कॅराटिन (Keratin protein) नावाच्या एका तंतुमय प्रोटीनपासून होते. यामुळे नखे मजबूत होतात. नखांच्या वाढीसाठी प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करावे असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. यासाठी तुम्ही सोयाबिन, डाळ, नट्स यांचा आहारात समावेश करावा.

ओमेगा-3
ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन १२ देखील नखांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे. संतुलित आहाराच्या सेवनाने नखांच्या समस्येपासून दूर राहता येते. पुरेशा प्रमाणात पोषणतत्वे नखांना मिळाल्यास नखं सुंदर आणि निरोगी राहतात.

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

Recommended Stories

Height Increase Exercises : तुमची उंची कमी आहे का? करा ही एक्सरसाइज
Long Haram Designs : साडीवर खुलून दिसतील अशा लॉंग हारच्या भन्नाट डिझाईन्स!