वजन कमी करण्यासाठी सध्या वेगवेगळे डाएट किंवा एक्सरसाइजची मदत घेतली जाते. पण तरीही काहींचे वजन कमी होत नाही. अशातच वजन कमी करण्यासाठी कांद्याचा वापर करू शकता. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Onion for Weight Loss : वाढलेले वजन नियंत्रणात आणणे किती कठीण असते हे सर्वांना माहिती आहे. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. काहीवेळेस घरगुती उपायांनी वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. पण तुम्हाला माहितेय का, किचनमधील कांदा तुमची वजन कमी करण्यासाठी मदत करू शकतो. कांद्यामध्ये क्वेरसेटिन नावाचे फ्लेवोनॉइड असते, जे शरिरातील वेगवेगळ्या ठिकाणी असणारी चरबी कमी करण्यास मदत करते. याशिवाय चयापचयाची क्रिया सुरळीत करण्यासही मदत होते. जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी कांद्याचा कशाप्रकारे वापर करू शकता याबद्दल सविस्तर...
कांद्याचे सूप
कांद्याचे सूप लंच किंवा डिनरवेळी पिऊ शकता. यामधील पोषण तत्त्वे दीर्घकाळ पोट भरुन ठेवण्यास मदत करतील. याचे सूप वजन कमी करण्यास मदत करू शकते. याच्या सूपच्या वेगवेगळ्या रेसिपी इंटरनेटवर पाहू शकता.
कांद्याची कोशिंबीर
कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अॅसिड असे अँटीऑक्सिडेंट्स असतात, जे शरिरातील मेटाबॉलिज्मचा रेट बूस्ट करतात. कांद्यामध्ये दही मिक्स करुन त्याची कोशिंबीर तयार करू शकता. याशिवाय कांद्यामध्ये काकडी, टोमॅटो, गाजर आणि दही देखील वापरू शकता. याची कोशिंबीर दुपारी लंच वेळी खाऊ शकता.
कांद्याचे पराठे
कांद्याचे पराठे वजन कमी करण्यास मदत करू शकतात. यामध्ये कमी तेलाचा वापर करा. अथवा तूपाचा वापर करू शकता. कांद्यामध्ये कमी कॅलरीज असल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. कांद्यामधील फाइटोन्युट्रिएंट्स वजन कमी करण्यास मदत करतात.
कांद्याचे सॅलड
कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. जेवणामध्ये कांद्याचे सॅलड तयार करू शकता. यामध्ये काकडी, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबाचा रस मिक्स करुन सॅलड तयार करू शकता. याचे सॅलड डाएटमध्ये दररोज खाऊ शकता.
वजन कमी करण्यासाठी कांद्याचे फायदे
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
पोटाची चरबी सोप्यात सोप्या पद्धतीने कमी कशी करावी, पद्धत जाणून घ्या