Numerology Predictions July 24 : आज गुरुवारचे अंकशास्त्र भविष्य, या अंकाची आर्थिक स्थिती चांगली राहील

Published : Jul 24, 2025, 07:27 AM IST

मुंबई - प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार तुमचा आजचा दिवस कसा जाईल ते पहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण आहे ते जाणून घ्या. आज तुमच्या नशिबातील घडामोडी समजून घ्या. 

PREV
19

अंक १ (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला झाला आहे)

गणेशजी म्हणतात, आज सर्व स्पर्धांमध्ये यश मिळेल. आजचा दिवस आयुष्यात यशाची नांदी येण्याचा दिवस आहे. आज भावांशी संबंधात अडचणी येऊ शकतात. नातलगांची चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. आज सामाजिक कार्यात तुमचे योगदान असेल. म्हणजेच सामाजिक सहभाग वाढेल. आज डोकेदुखी, मायग्रेन, थकवा यासारख्या समस्या येऊ शकतात. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. 

29

अंक २ (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० आणि २९ तारखेला झाला आहे)

गणेशजी म्हणतात, सर्व कामात सकारात्मक मन ठेवा. तुमचा पॉझिटिव्ह दृष्टिकोणच तुम्हाला यश मिळवून देईल. पती-पत्नीमध्ये संबंधात अडचणी येतील. जोडिदाराशी वागताना सन्मानाने वागा. त्यांचे काय म्हणणे आहे हे आधी जाणून घ्या. आज आरोग्य चांगले राहील. आज घरातील कामात प्रगती होईल. रेंगाळलेली काम पूर्णत्वास जातील.

39

अंक ३ (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ आणि ३० तारखेला झाला आहे)

गणेशजी म्हणतात, आर्थिक स्थिती चांगली राहील. पण पैसा जपून खर्च करा. उधळपट्टी करु नका. आज सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळेल. आज पोटाच्या समस्या होऊ शकतात. आजारपण अंगावर काढू नका. गंभीर समस्या असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये अडचणी येऊ शकतात. या तात्कालिक अडचणी असतील.

49

अंक ४ (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ आणि ३१ तारखेला झाला आहे)

गणेशजी म्हणतात, उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसेल. या निमित्ताने तुमचे आर्थिक चातुर्य सिद्ध होईल. आज विद्यार्थ्यांसाठी दिवस कठीण आहे. अभ्यासात मन लागणार नाही. पण आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. मानसिक ताणापासून मुक्ती मिळेल. मनात आनंद नांदेल. गॅस आणि पोटाच्या समस्या येऊ शकतात.

59

अंक ५ (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ५, १४, २३ तारखेला झाला आहे)

गणेशजी म्हणतात, सामाजिक आणि राजकीय कामात वेळ जाईल. त्यामुळे कुटुंबाला पुरेसा वेळ देता येणार नाही. याची मनात खंत राहिल. वेळेचे नियोजन करा. आज पती-पत्नीच्या नात्यात सुधारणा होईल. कौटुंबीक सुख लाभेल. एकमेकांवरचा विश्वास वाढेल. आज आरोग्याची काळजी घ्या. आज व्यवसायात यश मिळेल.

69

अंक ६ (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला झाला आहे)

गणेशजी म्हणतात, चालू असलेल्या ताणापासून मुक्ती मिळेल. आज सुटल्या सुटल्या सारखं वाटेल. तुम्ही जरा रिलॅक्स व्हाल. पण याचा अर्थ आळशी होऊ नका. कामात ऊर्जा ठेवा. आज तुमच्या दिनक्रमाकडे लक्ष द्या. पोट खराब होऊ शकते. आज कोणत्याही गोष्टीची चिंता येऊ शकते.

79

अंक ७ (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ७, १६ आणि २५ तारखेला झाला आहे)

गणेशजी म्हणतात, दिवस शांततेत जाईल. अप्रिय घटना घडणार नाहीत. आज आरोग्य चांगले राहील. शारीरिक समस्या सुटतील. आज कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. त्याचा आनंद उत्साह द्विगुणीत करेल. आज कोणत्याही वाईट बातमीने निराश होऊ शकता. वाईट घटना आयुष्याचा भाग असल्याचे समजून घ्या. आज गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे.

89

अंक ८ (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ८, १७ आणि २६ तारखेला झाला आहे)

गणेशजी म्हणतात, ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. जणू आजचा दिवस केवळ तुमच्यासाठी तयार झाला आहे. आज प्रेमाच्या बाबतीत चांगला दिवस आहे. तुम्हाला प्रेम मिळेल. तुम्ही इतरांना प्रेम द्याल. आज नात्यात बिघाड होऊ शकतो. किरकोळ चुका टाळा. आज जवळच्या नातेवाईकांशी वाद होऊ शकतो. आज बजेटबाबत सावध राहा.

99

अंक ९ (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला झाला आहे)

गणेशजी म्हणतात, घरातील कामात आणि नातेवाईकांसोबत दिवस जाईल. कौटुंबीक सहवास लाभल्याने मन आनंदी राहिल. आज आरोग्य चांगले राहील. आज धार्मिक कार्यात प्रगती होईल. दिवसाच्या दुसऱ्या भागात कोणत्याही गोष्टीची चिंता येऊ शकते. आज तुमचा स्वाभिमान वाढेल. तसेच आत्मविश्वासही वाढेल.

Read more Photos on

Recommended Stories