Daily Horoscope July 23 : आज बुधवारचे राशिभविष्य, मित्रांशी अनपेक्षित वाद होण्याची शक्यता!

Published : Jul 23, 2025, 07:27 AM IST

मुंबई - आज बुधवारचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे दैनिक भविष्य जाणून घ्या. हे भविष्य २३.०७.२०२५, बुधवारचे आहे.

PREV
112
मेष राशीचे भविष्य

व्यर्थ प्रवास करावे लागतील. त्यामुळे प्रवासाची तयारी ठेवा. आरोग्याच्या समस्या त्रास देतील. व्यवसायात श्रम वाढेल. हाती घेतलेल्या कामात अडथळे येतील. पण काळजी करु नका. काही दिवसांनी काम पूर्ण होईल. मित्रांशी अनपेक्षित वाद होतील. त्यामुळे काळजीपूर्वक व्यवहार करा. व्यवसाय, नोकरी मंद गतीने चालतील.

212
वृषभ राशीचे भविष्य

कुटुंबियांसह शुभकार्यांना उपस्थित राहाल. कौटुंबिक सहवास लाभेल. समाजात मान्यवरांकडून आदर वाढेल. बालमित्रांच्या भेटीमुळे आनंद होईल. समाजातील मान वाढेल. प्रतिष्ठा उंचावेल. सर्वत्र तुमचे नाव होईल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. नवीन वाहन खरेदीचा योग आहे. नोकरीत प्रगती होईल.

312
मिथुन राशीचे भविष्य

नवीन कर्जे घ्याल. नवीन खरेदीचा योग आहे. नातेवाईक आणि मित्रांशी काही बाबतीत मतभेद होतील. आरोग्याच्या समस्या त्रासदायक ठरतील. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याअनुषंगाने काम करा. काही कामे अर्धवट राहतील. अचानक प्रवासाचे योग आहेत. व्यवसाय विस्ताराचे प्रयत्न रखडतील. नोकरीत वरिष्ठांकडून दबाव वाढेल. पण मानसिक त्रात करुन घेऊ नका.

412
कर्क राशीचे भविष्य

स्नेहींकडून दुर्मिळ निमंत्रणे मिळतील. आर्थिकदृष्ट्या अनुकूल परिस्थिती असेल. हाती घेतलेल्या कामात अनुकूल वातावरण असेल. प्रवासात नवीन लोकांशी ओळख होईल. पण लगेच विश्वास ठेवू नका. काही काळ जाऊ द्या. दैवत सेवेच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. नोकरीत नवीन प्रोत्साहन मिळेल.

512
सिंह राशीचे भविष्य

नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. त्यातून नेटवर्किंग वाढेल. समाजात मान-सन्मान वाढेल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. संपत्तीत वाढ होईल. घरात आणि बाहेर अनुकूल वातावरण असेल. बालमित्रांसोबत मेजवानी आणि मनोरंजनात सहभागी व्हाल. व्यवसाय आणि नोकरीत समाधानकारक वातावरण असेल.

612
कन्या राशीचे भविष्य

आर्थिक अडचणींमुळे कर्ज घेण्याचे प्रयत्न कराल. अशा वेळी कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. घाबरुन जाऊ नका. अचानक प्रवासाचे योग आहेत. मित्रांशी काही बाबतीत वाद होतील. हाती घेतलेली कामे लांबतील. कौटुंबिक बाबतीत विचार स्थिर राहणार नाहीत. किरकोळ आजारपणाचे योग आहेत. नोकरी सामान्य राहिल. नोकरीत काही बदल होणार नाहीत.

712
तूळ राशीचे भविष्य

व्यर्थ प्रवास करावे लागतील. नातेवाईक आणि मित्रांसोबत तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दैवी कृपा राहिल. कौटुंबिक समस्या त्रासदायक ठरतील. त्या लगेच सोडविण्याचा प्रयत्न करु नका. कालांतराने त्या आपोआप सुटतील. आरोग्याबाबत निष्काळजीपणा करणे योग्य नाही. महत्वाची कामे पुढे सरकणार नाहीत. वाट बघावी लागेल. व्यवसाय काहीसा मंदावेल. नोकरी करणाऱ्यांवर कामाचा ताण वाढेल.

812
वृश्चिक राशीचे भविष्य

आर्थिक व्यवहार आशादायक राहतील. हाती घेतलेली कामे सुलभतेने पार पडतील. मनासारखा योग जुळून येईल. मनाला समाधान लाभेल. व्यवसाय फायदेशीर राहतील. नोकरीत पदोन्नती मिळेल. पगार वाढू शकतो. हातात जास्त पैसा पडेल. बेरोजगारांना शुभ बातम्या मिळतील. घर बांधण्याचे प्रयत्न वेगवान होतील. स्नेहींच्या भेटीमुळे आनंद होईल.

912
धनु राशीचे भविष्य

हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. वाहन खरेदीचे प्रयत्न यशस्वी होतील. घरी हवी तशी गाडी येईल. नोकरीत वरिष्ठांशी चर्चा फायदेशीर ठरेल. दूरच्या नातेवाईकांच्या भेटीमुळे आनंद होईल. व्यवसायात गुंतवणूक मिळेल. व्यवसायात प्रगती साधली जाईल. बेरोजगारांना शुभ बातम्या मिळतील. नोकरी मिळण्याची शक्यता वाढेल.

1012
मकर राशीचे भविष्य

व्यवसायात विचार स्थिर राहणार नाहीत. मन चंचल होईल. पण ते स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. घरात आणि बाहेर जबाबदाऱ्या वाढतील. त्यातून तुमचे नेतृत्वही सिद्ध होईल. कुटुंबातील वरिष्ठांच्या आरोग्याबाबत अधिक काळजी घ्यावी लागेल. महत्वाची कामे रखडतील. व्यवसाय काहीसा मंदावेल. नोकरीत त्रास वाढेल. दबाव येईल. 

1112
कुंभ राशीचे भविष्य

महत्वाची कामे श्रमाने पूर्ण होतील. कष्ट करावे लागतील. काही कामे पुढे ढकलाल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आजारी पडण्याची शक्यता बळावेल. आर्थिक व्यवहार निराशाजनक राहतील. व्यवसाय निरुत्साहजनक राहतील. नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे विश्रांती मिळणार नाही.

1212
मीन राशीचे भविष्य

मौल्यवान कपडे आणि दागिने खरेदी कराल. घरात आनंदाचे वातावरण राहिल. नातेवाईकांशी जमीनविषयक वाद मिटतील. समाजात मान वाढेल. प्रतिष्ठा वाढेल. हाती घेतलेली कामे यशस्वी होतील. आत्मविश्वास वाढलेला दिसून येईल. बालमित्रांच्या भेटीमुळे आनंद होईल. दैवत सेवेच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. व्यवसाय आणि नोकरीत अपेक्षा पूर्ण होतील.

Read more Photos on

Recommended Stories