मुंबई - प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या अंकशास्त्रानुसार आजचा दिवस तुमचा कसा जाईल ते पाहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण.
गणेशजी म्हणतात, आत्मविश्वास टिकून राहील. आज वंशपरंपरागत काही काम अडकू शकते. पण संयम ठेवा. कालांतराने हे काम झालेले दिसून येईल. आज पती-पत्नीचे संबंध गोड असतील. कौटुंबीक सहवास लाभेल. आज व्यवसायात प्रगती होईल. हातात पैसा पडेल.
29
अंक २ (२, ११, २० आणि २९ तारखेला जन्मलेले)
गणेशजी म्हणतात, कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. त्यांच्या सल्ल्याने वाटचाल करा. आज कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. आज करिअरशी संबंधित कामात प्रगती होईल. आज कोणाशीही वाद होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक शब्द जपून बोला.
39
अंक ३ (३, १२, २१ आणि ३० तारखेला जन्मलेले)
गणेशजी म्हणतात, आजचा दिवस शांततापूर्ण आणि सकारात्मक राहील. आज व्यवसायात प्रगती होईल. आज धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करू शकता. यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आज कोणताही प्रवास करताना सावधगिरी बाळगा. अपघात होण्याची शक्यता आहे. आज वादात अडकू शकता.
गणेशजी म्हणतात, सकारात्मक लोकांसोबत काही वेळ घालवाल. त्यामुळे तुम्हाला आज मानसिकदृष्ट्या मजबूत वाटेल. मानसिक आधार मिळेल. आज कोणत्याही कामात घाई करू नका. आज मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहाल. कौटुंबीक सुख लाभेल.
59
अंक ५ (५, १४, २३ तारखेला जन्मलेले)
गणेशजी म्हणतात, आत्मपरीक्षणात दिवस जाईल. त्यातुन तुमच्या चुका तुमच्या नजरेस येतील. त्यातून काही तरी बोध घ्या. आज पती-पत्नीच्या नात्यात सुधारणा होईल. कौटुंबीक सुख मिळेल. व्हायरल तापाची समस्या उद्भवू शकते. पावसात भिजणे शक्यतोवर टाळा.
69
अंक ६ (६, १५ आणि २४ तारखेला जन्मलेले)
गणेशजी म्हणतात, आत्मपरीक्षणात दिवस जाईल. आज बदलत्या वातावरणामुळे ताप येऊ शकतो. आज शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्याशी बोलणे शक्यतोवर टाळा. व्यवसायात प्रगती होईल. त्यातून चार पैसे हातात पडतील. पण वारेमाप खर्च करु नका. पैसा जपून ठेवा.
79
अंक ७ (७, १६ आणि २५ तारखेला जन्मलेले)
गणेशजी म्हणतात, नकारात्मक विचारांमुळे डोकेदुखी होऊ शकते. पती-पत्नीचे संबंध सुधारतील. आज बजेटकडे लक्ष द्या. अवास्तव खर्च होण्याची दाट शक्यता आहे. खिसा मोकळा करा. पण तो खाली होईल एवढा करु नका. आज वेळ अनुकूल राहील.
89
अंक ८ (८, १७ आणि २६ तारखेला जन्मलेले)
गणेशजी म्हणतात, कुटुंब आणि आर्थिक बाबींवर निर्णय घ्यावे लागू शकतात. आज कामाच्या ठिकाणी आणि नोकरीत प्रगती होईल. आज दुपारनंतर परिस्थिती अनुकूल असेल. त्यावेळी महत्त्वाची कामे पार पाडण्याचा प्रयत्न करा. हा काळ तुमच्यासाठी शुभ असेल. आज सर्व कामात धीर धरा. प्रगती होईल.
99
अंक ९ (९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेले)
गणेशजी म्हणतात, दिवस मिश्र जाईल. आज सर्व कामात धीर आणि संयम बाळगा. आज आर्थिक स्थिती चांगली राहील. आज स्वतःला शक्तिशाली वाटेल. आज सर्व कामात सावधगिरी बाळगा. असे केल्याने नुकसान टळेल. तुमची फसवणूक होणार नाही.