Numerology Aug 16 : आज शनिवारचे अंकशास्त्र भविष्य, या अंकाच्या लोकांचे आरोग्य धोक्यात येईल!

Published : Aug 16, 2025, 10:03 AM IST

मुंबई - प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार आजचा दिवस तुमचा कसा जाईल ते पहा. प्रत्येक व्यक्तीचे जीवन त्याच्या जन्मतारीखेशी जोडलेले असते. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडवून आणणार आहे, ते जाणून घेऊया. 

PREV
19
अंक १:

आज अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. खूप दिवसांपासून जी कामे प्रलंबित होती, ती आज मार्गी लागतील. मात्र आरोग्याबाबत सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवू शकतो, त्यामुळे थंड पदार्थ टाळा. कुटुंबासोबतचा वेळ आनंददायी जाईल आणि कौटुंबिक वातावरण सुखकर राहील. मात्र कर्जासंबंधी कोणत्याही नव्या गोष्टीत हात घालू नका, अन्यथा अडचणीत सापडू शकता.

29
अंक २:

आज तुम्ही मालमत्ता खरेदी किंवा गुंतवणुकीबाबत विचार करू शकता. मात्र दिवसात काही प्रतिकूल परिस्थिती समोर येऊ शकते. मानसिक ताण आणि थकवा जाणवेल. त्यामुळे स्वतःला वेळ द्या आणि विश्रांती घ्या.

39
अंक ३:

गाडी किंवा मालमत्ता खरेदीसाठी हा दिवस चांगला आहे. व्यवसायिकांना नवीन करार किंवा व्यवहार जुळण्याची शक्यता आहे. मात्र रागावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. जास्त चिडचिड केल्यास नातेसंबंध बिघडू शकतात. थकवा आणि मानसिक तणाव टाळण्यासाठी दिवसाची योग्य आखणी करा.

49
अंक ४:

धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. पूजा-पाठ किंवा सामाजिक कार्यक्रमात भाग घेतल्याने मनाला शांती मिळेल. आरोग्य चांगले राहील, पण कोणत्याही कामात निष्काळजीपणा करू नका. पती-पत्नीमधील नातेसंबंध अधिक दृढ होतील.

59
अंक ५:

आज नातेवाईक व शेजाऱ्यांसोबतचे संबंध चांगले राहतील. संवादातून गैरसमज दूर होतील. मात्र आरोग्याची थोडीशी काळजी घ्यावी लागेल. ताप किंवा डोकेदुखी जाणवू शकते. दाम्पत्य जीवन आनंदी राहील आणि आपुलकी वाढेल.

69
अंक ६:

आजच्या दिवशी सर्व कामे बुद्धीने आणि शांतपणे करा. पती-पत्नीमधील संबंध चांगले राहतील, परंतु राग आणि हट्टीपणा टाळणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम आहे. नियोजनबद्ध काम केल्यास चांगले यश मिळेल.

79
अंक ७:

ग्रहांची स्थिती आज तुमच्या पाठीशी आहे. नवीन गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे. मात्र मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी. आज तुम्ही हाती घेतलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करू शकाल.

89
अंक ८:

आजचा दिवस चांगल्या कामात जाईल. सामाजिक कार्य किंवा दानधर्मातून समाधान मिळेल. दाम्पत्य जीवन आनंददायी होईल. मात्र पोटाच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे खाण्यापिण्यात संयम बाळगा. पैशांची व वस्तूंची जपणूक करा, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे.

99
अंक ९:

आज प्रतिकूलतेचा सामना करण्यासाठी आत्मविश्वास आणि समजूतदारपणा आवश्यक आहे. जास्त ताण घेऊ नका. घरात काही बदल किंवा सुधारणा करण्यापूर्वी बजेट नीट तपासा. विद्यार्थ्यांना अभ्यासात निराशा वाटू शकते, त्यामुळे संयम बाळगणे आवश्यक आहे.

Read more Photos on

Recommended Stories