त्वचेच्या आरोग्यासाठी आहारात समाविष्ट करायलाच हवेत असे हायलुरोनिक ऍसिड असलेले पदार्थ कोणते आहेत, ते पाहूया.
पालकचा आहारात समावेश केल्याने हायलुरोनिक ऍसिड आणि कोलेजन तयार होण्यास मदत होते.
व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असलेली संत्र्यासारखी फळे हायलुरोनिक ऍसिड आणि कोलेजन तयार करण्यास मदत करतात.
गाजर, बीट, रताळे यांसारख्या कंदमुळे खाल्ल्याने देखील हायलुरोनिक ऍसिड तयार होण्यास मदत होते.
आरोग्यदायी फॅट्स आणि मॅग्नेशियमने भरपूर असलेले अॅव्होकॅडो देखील हायलुरोनिक ऍसिड तयार करण्यास मदत करते.
बदाम, अक्रोड, जवस, चिया सीड्स यांसारखे ओमेगा-3 फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन ई असलेले नट्स आणि सीड्स हायलुरोनिक ऍसिडचे संरक्षण करतात.
Rameshwar Gavhane