हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करणारे पाच मसाले.
दालचिनीमुळे वाईट कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी कमी होते. हे सर्व हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
लसणाला अनेक आजारांवर, विशेषतः हृदयाशी संबंधित आजारांवर नैसर्गिक उपाय मानले जाते. त्यात 'ॲलिसिन' नावाचे रसायन असते.
मेथीमध्ये विरघळणारे फायबर असते. ते पचनमार्गातील कोलेस्ट्रॉलला बांधून शरीराबाहेर टाकते, ज्यामुळे एकूण LDL कोलेस्ट्रॉल कमी होते.
लवंग लहान असली तरी गुणांनी मोठी आहे. यात युजेनॉलसारखे अँटीऑक्सिडंट्स असून, त्यात दाहक-विरोधी आणि अँटी-प्लेटलेट गुणधर्म आहेत.
हळदीतील कर्क्युमिन सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करते आणि एंडोथेलियल कार्य सुधारते, हे सिद्ध झाले आहे.
Rameshwar Gavhane