बीपी कमी करण्यासाठी आहारात समाविष्ट करण्यासारख्या काही पेयांबद्दल जाणून घेऊया.
कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
बीटामध्ये नायट्रेट्स भरपूर असतात. यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.
पोटॅशियमयुक्त नारळ पाणी प्यायल्याने बीपी कमी होण्यास मदत होते.
टोमॅटोमध्ये पोटॅशियम आणि लाइकोपीन असते. 100 ग्रॅम टोमॅटोमध्ये 237 मिग्रॅ पोटॅशियम असते. यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
व्हिटॅमिन सीने भरपूर आवळ्याचा रस प्यायल्याने बीपी कमी करण्यास मदत होते.
फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर संत्र्याचा रस प्यायल्याने बीपी कमी होण्यास मदत होते.
Rameshwar Gavhane