Indian Places Like Europe: युरोपला फिरायला जाणं हे अनेकांचं स्वप्न असतं. पण, भारतातही अशी काही ठिकाणं आहेत, जी युरोपच्या सुंदर ठिकाणांना टक्कर देतात. चला तर मग पाहूया ही ठिकाणं कोणती आहेत.
तुम्हाला बर्फ, डोंगर आणि हिरवीगार दऱ्या आवडत असतील, तर स्वित्झर्लंडलाच जायला हवं असं नाही. काश्मीरमधील गुलमर्ग आणि हिमाचलमधील खज्जियार ही ठिकाणं स्वित्झर्लंडलाही टक्कर देतील इतकी सुंदर आहेत. बर्फवृष्टी पाहण्यासाठी डिसेंबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ आहे. तर आल्हाददायक हवामान आणि हिरवाईसाठी एप्रिल ते जून हा काळ उत्तम आहे.
27
व्हेनिस vs आलेप्पी
व्हेनिस हे त्याच्या कालव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तर आलेप्पीला 'पूर्वेकडील व्हेनिस' म्हणून ओळखले जाते. येथे बॅकवॉटर्सची कोणतीही कमतरता नाही. तुम्ही हाऊसबोटमधून प्रवास करत नारळाची झाडं आणि छोट्या गावांचे सुंदर दृश्य अनुभवू शकता. सप्टेंबर ते फेब्रुवारी दरम्यान येथील हवामान खूप सुखद असते.
37
ग्रीस vs पाँडिचेरी
ग्रीसमधील पांढऱ्या आणि निळ्या रंगाची घरं नेहमीच लक्ष वेधून घेतात. असंच काहीसं दृश्य पाँडिचेरीमध्येही पाहायला मिळतं. इथे तुम्ही फ्रेंच पद्धतीच्या रस्त्यांवरून फिरू शकता, समुद्रकिनाऱ्यावर आराम करू शकता आणि सुंदर बीच कॅफेमधील पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. पाँडिचेरी हे युरोपियन बीच सिटीचं एक उत्तम भारतीय रूप आहे. ऑक्टोबर ते मार्च हा पाँडिचेरीला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे.
प्रेमाचं शहर पॅरिसला टक्कर देणारं भारतीय शहर म्हणजे उदयपूर. तलाव, राजवाडे आणि सुंदर सूर्यास्त ही उदयपूरची खासियत आहे. पिछोला तलावावर कॅण्डल लाईट डिनर करणं म्हणजे रात्री आयफेल टॉवर चमकताना पाहण्यासारखंच स्वप्नवत आहे. तुमच्या जोडीदारासोबत भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. सप्टेंबर ते मार्च हा येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे.
57
स्कॉटलंड vs कूर्ग
हिरवळ, डोंगररांगा आणि धुक्यामुळे स्कॉटलंडचे दृश्य नेहमीच खास असते. पण कर्नाटकातील कूर्गमध्येही हिरवीगार डोंगरं, धुक्याने भरलेली सकाळ आणि दूरवर पसरलेले कॉफीचे मळे आहेत. निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यासाठी, कॉफीचा आस्वाद घेण्यासाठी आणि शांत वातावरणात राहण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर हा कूर्गला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे.
67
प्राग vs जयपूर
ही दोन्ही शहरं ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध आहेत आणि आकर्षक वास्तुकलेने परिपूर्ण आहेत. प्रागमध्ये किल्ले आणि जुने रस्ते आहेत, तर जयपूरमध्ये किल्ले, राजवाडे आणि रंगीबेरंगी बाजारपेठा आहेत. जुन्या शहरातून फिरणं किंवा आमेर फोर्टला भेट देणं तुम्हाला राजेशाही थाटाचा अनुभव देतं. ऑक्टोबर ते मार्च हा येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे.
77
अमाल्फी कोस्ट vs गोवा
गोवा सुंदर समुद्रकिनारे आणि समुद्राच्या दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. दक्षिण गोव्याच्या शांत किनाऱ्यांपासून ते उत्तर गोव्याच्या कॅफे आणि बाजारांपर्यंत, इटलीच्या अमाल्फी कोस्टसारखंच शांत वातावरण येथे अनुभवायला मिळतं. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा गोव्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे.