Narak Chaturdashi 2024 : नरक चतुर्दशी साजरी करण्यामागील वाचा पौराणिक कथा

Published : Oct 19, 2024, 09:09 AM IST
Naraka Chaturdashi

सार

Narak Chaturdashi 2024 : दिवाळी सण सुरु होण्याच्या एक दिवस आधी नरक चतुर्दशी साजरी केली जाते. यामागे एक पौराणिक भगवान श्रीकृष्ण आणि राक्षस नरकासुरासंदर्भात आहे. जाणून घेऊया यंदा नरक चतुर्दशी कधी आणि पौराणिक कथेबद्दल सविस्तर...

Narak Chaturdashi 2024 Katha : हिंदू धर्मात प्रत्येक कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. दिवाळीच्या एक दिवस आधी नरक चतुर्दशी असते. यंदा नरक चतुर्दशी येत्या 31 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी मृत्यूची देवता मानल्या जाणाऱ्या यमराजची पूजा केली जाते. यमराजच्या नावाने घराच्या दक्षिणेला दिवाही लावला जातो. जाणून घेऊया नरक चतुर्दशी का साजरी केली जाते आणि यामागील पौराणिक कथा सविस्तर....

नरक चतुर्दशीची पौराणिक कथा
प्राचीन काळात नरकासुर नावाचा एक राक्षस होता. या राक्षाने आपल्या अत्याचाराने स्वर्ग आणि पृथ्वीवर हाहाकार माजवला होता. याशिवा काही ऋषीमुनी, संत आणि देवतांनाही त्रास देण्यास सोडले नव्हते. नरकासुराची ताकद, क्रुरता आणि अत्याचारामुळे मनुष्यासह देवही त्रस्त झाले होते. नरकासुराने काही राजा आणि लोकांच्या 16 हजार कन्यांना बंदी केले होते. या सर्व कन्यांसोबत नरकासुर जबरदस्तीने विवाह करणार होता.

नरकासुराच्या अत्याचाराला कंटाळून एके दिवसी इंद्र देव भगवान श्रीकृष्णाकडे गेले आणि त्याच्याबद्दलच्या सर्व गोष्टी सांगितल्या. अशातच नरकासुराचा वध एका स्री च्या हस्ते होईल अशा श्राप मिळाला होता आणि ही गोष्ट भगवान श्रीकृष्ण यांना माहिती होती. यामुळे श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामेला सोबत घेऊन गरुडावर स्वारी करत नरकासुराकडे पोहोचले. येथे जाऊन श्रीकृष्णाचा सामना मुर नावाच्या दैत्य आणि त्याच्या सहा पुत्रांसोबत झाला. या सर्वांना भगवान श्रीकृष्णाने पत्नी सत्यभामेसोबत संपवले.

या सर्वांचा वध झाल्याचे कळता नरकासुर आपल्या सैन्यासोबत युद्धास तयार झाला. यावेळी श्रीकृष्णाने सत्यभामेच्या मदतीने नरकासुराचा वध केला. नरकासुराचा वध झाल्यानंतर त्याचा पुत्र भगदत्तला श्रीकृष्णाने अभय देऊ असे वरदान देत प्रागज्योतिषचा राजा केले. ज्या दिवशी नरकासुराचा वध झाला त्या वेळी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी होती. यामुळेच या तिथीला नरक चतुर्दशी असे म्हटले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराने बंदी केलेल्या सर्व 16 हजार कन्यांना मुक्त होते. म्हणूनच नरक चतुर्दशीला दिवे लावून आनंद साजरा केला जातो.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Diwali Padwa 2024 : यंदा दिवाळी पाडवा कधी? वाचा बलिप्रतिपदेचे महत्व

Narak Chaturdashi 2024 च्या दिवशी काय करावे आणि काय नाही? घ्या जाणून

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

Recommended Stories

Lemon Peel Uses : लिंबाची साल फेकून देताय? थांबा! हे ८ भन्नाट उपयोग नक्की पाहा
Navratri 2026 : गरबा नाईटसाठी ट्राय करा हे ५ बॉलिवूड आय मेकअप लुक्स