दररोज सकाळी करा ही 3 योगासने, दिवाळीआधी यकृत आणि किडनी होईल डिटॉक्स

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच घराची सजावट ते खरेदी करण्यामध्ये आपला वेळ निघून जातो. पण आरोग्याकडे दुर्लक्ष होते. अशातच सणासुदीच्या काळात हेल्दी राहण्यासाठी हलका स्वरुपाचा व्यायामही फार महत्वाचा आहे.

Chanda Mandavkar | Published : Oct 19, 2024 3:05 AM IST

Yoga Postures for Kidney and Liver Detox : भारतीयांमध्ये दिवाळीचा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. घराची सजावट ते पाहुण्यांची वर्दळ सुरू असते. यावेळी वेगवेगळे पदार्थ तयार करुन खाल्ले जातात. अशा सर्व गोष्टींमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे सणासुदीच्या काळात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते. खासकरुन यकृत आणि किडनी डिटॉक्स होणे अत्यंत गरजेचे असते. कारण शरिरातील हे दोन अवयव बॉडीमधील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. यामुळे किडनी आणि यकृतचे आरोग्य उत्तम नसल्यास आपण आजारांचा बळी पडू शकतो.

जाणून घेऊया काही सोपे योगासने ज्याच्या मदतीने यकृत आणि किडनी डिटॉक्स होण्यास मदत होऊ शकते. याशिवाय दिवाळीआधीच दररोज सकाळी ही योगासने केल्याने आरोग्यही सुधारले जाईल.

अर्ध मत्स्येन्द्रासन
अर्ध मत्स्येन्द्रासन योगासनामुळे यकृत आणि किडनी शुद्ध होण्यास मदत होते. या आसनामुळे पोटाच्या स्नायूंवर दबाव पडला जात असल्याने शरिराच्या आतमधी अवयवयांना आपोआप मसाज मिळतो. याशिवाय यकृतातील घाण बाहेर काढण्यासह किडनीचे काम करण्याची क्षमता वाढवते.

भुजंगासन
भुजंगासन यकृत आणि किडनीसाठी अत्यंत उपयुक्त आसन आहे. या आसनामुळे पोटातील स्नायूंवर दबाव पडला जातो. याशिवाय यकृत आणि किडनीमध्ये रक्तपुरवठा सुरळीत होते. याशिवाय दोन्ही अवयव डिटॉक्स होण्यास मदत होते.

धनुरासन
धनुरासन केल्याने संपूर्ण पोटासह आजूबाजूच्या भागावर दबाव पडला जातो. यामुळे किडनी आणि यकृत डिटॉक्स होण्यास मदत होते. या आसनामुळे पचनसंस्था मजबूत होते. शरिरातील घाण काढण्याची प्रक्रिया वेगाने होते.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

यंदाच्या दिवाळीत Hruta Durgule सारखा करा साज, चारचौघांत दिसाल उठून

चेहऱ्याला लावा हे 4 प्रकारचे Essential Oils, नितळ आणि चमकदार होईल त्वचा

Read more Articles on
Share this article