मेंदीचे रंग गडद करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

Published : May 06, 2025, 04:57 PM IST
मेंदीचे रंग गडद करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

सार

फॅशन:  प्रत्येक महिलेला हातापायांवर मेंदी काढायला आवडते. यामुळे हाताचे सौंदर्य अधिक खुलते. पण बऱ्याचदा मेंदी काढल्यानंतर ती जास्त रंगत नाही अशी तक्रार काही जणी करतात. मेंदी काढण्यापूर्वी हाताला नक्की काय लावावे याबद्दल जाणून घेऊया.

मेंदीचे उपाय: सणासुदीचे दिवस असोत किंवा लग्नसोहळा, प्रत्येक महिलेला हातावर मेंदी काढणे फार आवडते. खरंतर मेंदी काढणे शुभ मानले जाते. पण बाजारातून मेंदीचा कोन खरेदी करण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी देखील तयार करू शकता. घरी मेंदी तयार करताना त्यामध्ये काही नैसर्गिक वस्तूंचा वापर करू शकता.

हातावरील मेंदीचा रंग अधिक गडद होण्यासाठी नक्की काय करावे हे कळत नाही? यासाठी पुढील काही उपाय वापरू शकता.

मेंदी काढण्यापूर्वी करा हे काम
आपण मेंदी काढतो पण त्याचा रंग अधिक गडद होत नाही. यासाठी तुम्हाला थोडी मेहनत करावी लागेल. फार काही करावे लागणार नाही, पुढील गोष्टी केवळ लक्षात ठेवा.

नीलगिरीचे तेल
नीलगिरीच्या तेलामुळे उष्णता निर्माण होते, ज्यामुळे मेंदीचा रंग गडद होण्यास मदत मिळते. त्यामुळे मेंदी काढण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून त्यावर नीलगिरीचे तेल लावा.

काही लोक लवंगाचे तेलही लावतात. पण मेंदी पूर्ण काढून झाल्यानंतर लवंगाचे तेल लावल्यास ते अधिक फायदेशीर ठरू शकते. लक्षात ठेवा, मोहरीचे तेल किंवा अन्य कोणतेही तेल हाताला मेंदी काढण्यापूर्वी लावू नका. यामुळे मेंदीचा रंग फिकट होऊ शकतो.

मॉइश्चरायझर
ज्यावेळी मेंदी काढता त्याआधी हातांवर कोणत्याही प्रकारची घट्ट ब्युटी क्रिम अथवा मॉइश्चरायझर अजिबात लावू नका. यामुळे मेंदीचा रंग गडद होणार नाही. मेंदी लावण्यापूर्वी हात अधिक तेलकट नसावेत याची देखील काळजी घ्यावी.

हे उपाय करा वापर
तव्यावर लवंग गरम करा. लवंग गरम करताना त्यामधून निघणाऱ्या धुरावर मेंदी लावलेले हात धरा. यामुळे मेंदीचा रंग गडद होण्यास मदत होईल. याशिवाय मेंदी काढून झाल्यास लिंबूपाणी देखील हातांना लावू शकता. लिंबूपाण्यामुळे मेंदीचा रंग गडद होण्यासह दीर्घकाळ हातावर टिकून राहील. पण लक्षात ठेवा, लिंबूपाणी मेंदीसाठी वापरताना लिंबाच्या रसाचे काही थेंबच वापरा. अन्यथा मेंदीचा रंग फिकट होऊ शकतो.

मेंदीचे हात धुतल्यानंतर
मेंदीचा रंग गडद झाला नसल्यास यासाठी एखादा वेदना कमी करणारा बाम लावू शकता. बाम हातांना लावून ठेवल्यानंतर काही तासांनी मेंदीचा रंग गडद होऊ शकतो. केमिकलयुक्त मेंदीचा वापर करताना कोणत्याही प्रकारचा बाम हाताला लावू नका. यामुळे त्वचेवर अ‍ॅलर्जीची समस्या निर्माण होऊ शकते.

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

PREV

Recommended Stories

फक्त ७ डिझाईन्स! जडाऊ गोल्ड प्लेटेड इअरिंग्ज जे प्रत्येक लुकला देतील रॉयल टच; तुम्हीही लगेच ट्राय करा!
घरीच पिकवा, ताजी खा! हिवाळ्यात कमी कष्टात आणि कमी जागेत येणाऱ्या 'या' ७ सुपर हेल्दी भाज्या!