Nag Panchami 2025 : नागपंचमी साजरी करण्यामागे ही आहे कथा, आयुष्यात येईल सुख-शांती

Published : Jul 28, 2025, 01:06 PM ISTUpdated : Jul 28, 2025, 01:50 PM IST
nag panchami 2025

सार

Nagpanchami 2025 : येत्या 29 जुलैला नागपंचमीचा सण साजरा केला जातो. या सणासंदर्भात काही मान्यता आणि कथा प्रचलित आहेत. नागपंचमीच्या दिवशी या संदर्भातील एक कथा आहे ती वाचल्यानंतर व्यक्तीच्या आयुष्यात सुख-शांती येते असे मानले जाते.

Nagpanchami Story in Marathi : श्रावण महिन्यात भगवान शंकरासह नाग देवतेची पूजा केली जाते. या महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. येत्या 29 जुलैला नागपंचमी साजरी केली जाणार आहे. अशातच नागपंचमी का साजरी केली जाते यामागे काही कथा प्रचलित आहेत. असे मानले जाते की, नागपंचमीला त्यासंबंधित कथा वाचल्यास त्यांना सर्प दंशाची भीती राहत नाही आणि घरात सुख-समृद्धी येते. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो त्यांनी ही कथा नक्की वाचावी असे सांगितले जाते. जाणून घेऊया नागपंचमीची कथा...

नागपंचमीची कथा

नागपंचमीच्या कथेनुसार, पुरातन काळात एका शहरामध्ये एक धनवान व्यापारी राहत होता. याची सात मुले होती आणि त्यांची लग्नही झाली होती. यापैकी सर्वात लहान मुलाच्या पत्नीला भाऊ नव्हता. एके दिवशी व्यापाऱ्याच्या सर्व सुना माती आणण्यासाठी शेतात गेल्या. त्यावेळी मोठ्या सूनने कुदळेने माती खोदण्यास सुरुवात केली असता तेथून एक साप बाहेर आला. हा साप पाहिल्यानंतर ती घाबरली. यानंतर तिने सापावर हल्ला करत त्याला जखमी केले. त्यावेळी लहान सुनेला सापाची दया आली आणि तिने त्याला उचलून एका लहान झाडाखाली ठेवले. हे केल्यानंतर सर्व सुना घरी परतल्या गेल्या. लहान सुनेच्या मनात जखमी सापाबद्दल विविध विचार येत होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी लहान सुन ज्या ठिकाणी जखमी सापाला ठेवले होते तेथे पुन्हा गेली. तोवर साप ठिक झाला होता. उपकाराची परतफेड करण्यासाठी सापाने तिला आपली लहान बहीण मानले. काही दिवसांनी हाच साप व्यक्तीच्या रुपात लहान सुनेच्या घरी गेला आणि म्हणाला, मी तुमच्या लहान सुनेचा दूरचा भाऊ आहे. तिला काही दिवस घेऊन जाण्यासाठी आलो आहे. हे ऐकल्यानंतर घरातल्यांनी त्याच्यासोबत लहान सुनेला पाठवले.

सापाने आपल्या बहिणीला आलिशान घरात ठेवण्यास तिच्या इच्छा पूर्ण केल्या. काही दिवसानंतर बहिण सासरी परतणार असल्याने तिला सापाने खूप धन आणि मणिचा हार दिला. याच हाराची प्रशंसा दूरवर पसरली गेली. ही गोष्ट राज्यातील राणीला कळले असते असा तिने तो हार लहान सुनेकडून घेतला. सापाला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तो राणीकडे गेला.

सापाला पाहून राणी घाबरली. सापाने व्यक्ती रुपात आलेली कथा आणि सत्य राणील सांगितले. यानंतर राणीने तो हार लहान सुनेला परत केला. यानंतर लहान सुनेने भावाची कथा घरातील मंडळींना सांगितली. यानंतर संपूर्ण परिवाराने नाग देवतेचा सत्कार केला. तेव्हापासून नागपंचमीचा सण साजरा केला जातो.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

PREV
Read more Articles on

Recommended Stories

पत्नीला भेट द्या 5gm चे सुंदर सुई धागा कानातले, खुप सुंदर दिसतील!
iPhone Air चा राहू काळ काही संपेना, आधी विक्री घटली, आता रिसेल व्हॅल्यूही कोसळली!